आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dudh And Loni Holi, An Activity To Thank Nature, Will Be Played In The Valleys Of The Himalayas From Today

दिव्य मराठी विशेष:हिमालयाच्या खाेऱ्यात आजपासून खेळली जाईल दूध अन् लोण्याची होळी, निसर्गाचे आभार मानण्यासाठीचा एक उपक्रम

मनमीत | डेहरादून3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमध्ये दोन वर्षांनंतर लोणी महोत्सवाला सुरूवात होत आहे. याला स्थानिक भाषेत अंढूडी उत्सव म्हटले जाते, जो समुद्र सपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर आणि २८ चौरस किलोमीटरमध्ये विस्तारलेल्या दयारा बुग्याल (हिरव्या गवतांचे मैदान) मध्ये पारंपरिकरित्या सजारा केला जातो. यंदा दोन वर्षांनंतर याचे आयोजन होत आहे. गंगोत्रीचे आमदार सुरेश चौहान यांनी सांगितले की, प्राचीन काळापासून गुराखी लोक हा साजरा करतात. त्याकाळापासून त्याला अंढूडी नावाने ओळखले जाते. काही वर्षांपासून याला बटर फेस्टिवल असे नामकरण करत मोठ्या स्वरूपात साजरा केला जात आहे. यात मुख्यमंत्री पुष्कर धामी आणि पर्यटन मंत्री सतपाल महाराजही सहभागी होतील.

दयारा पर्यटन उत्सव समिती रैथलचे अध्यक्ष मनोज राणा सांगतात की, अंढूडी उत्सव स्थानिक गावकरी आणि पर्यटकांचा संयुक्त उत्सव आहे. यात स्थानिकांसह देश-विदेशातून येणारे पर्यटकही रंगी-बेरंगी फुलांच्या सुगंधात दूध, मट्ठा आणि लोण्यासह होळी खेळताना दिसतील. मनोज सांगतात की, भटवाडी ब्लॉकच्या रैथल गावापाासून आठ किलोमीटर दूरपर्यंत जवळपास २८ चौरस किलोमीटरच्या परिसरात पसरलेल्या दयारा बुग्यालमध्ये दरवर्षी रैथलचे गावकरी भाद्रपद महीन्याच्या संक्रातीला पारंपरिकरित्या हा अढूडी उत्सवाचे आयोजन असते. या दिवशी गावकरी दयारा बुग्याल स्थित आपल्या कुरणांमध्ये एकत्रितरित्या पशुधन आणि इष्ट देवी देवतांचे पूजन करत दूध, दही, मठ्ठा, लोणी इत्यादी उप्तादनांचाच प्रसाद चढवतात. बटर फेस्टसाठी परदेशी पर्यटकही ही येतात, यंदा ही संख्या थोडी कमी आहे. अध्यक्ष मनोज राणांनी यंदा महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातूनही पर्यटक आल्याचे सांगितले.

सण असल्याने गावकरी गुरे घेऊन डोंगरावरून खाली येतात रैथल गावकरी उन्हाळ्याची चाहूल लागताच आपल्या गुरांसह दयारा बुग्यालसह अन्य ठिकाणी बनलेल्या कुरणांमध्ये ग्रीष्मकालीन प्रवासासाठी पोहोचतात. यात बुग्यालमध्ये उगवणारे औषधीय गुण असलेले मुबलक गवत आणि अनुकूल वातावरणाचा अनुकूल परिणाम दुधाळ प्राणी व दूध उत्पादनावर ही होतो.

बातम्या आणखी आहेत...