आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Due To Backwardness In Results, Only 5% Choose Hindi Medium, Translation Of Questions From English Is Very Complicated At Present, It Needs To Be Improved.

दिव्य मराठी विशेष:निकालात पिछाडीमुळे 5 टक्केच निवडतात हिंदी माध्यम, प्रश्नांचा इंग्रजीतून अनुवाद सध्या खूप क्लिष्ट, यात सुधारणेची आवश्यकता

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) प्रशासकीय सेवा परीक्षेत रवी सिहागची १८वी रँक आणि सुनील धनवंताच्या २२व्या रँकने हिंदी माध्यम परीक्षार्थींच्या पुन्हा अपेक्षा जागृत झाल्या आहेत. हिंदी माध्यमातून परीक्षा देणारे दोन जण टॉप २५ मध्ये ७ वर्षांनंतर स्थान निर्माण करू शकले. मात्र, वास्तव वेगळे आहे. १००० पैकी सरासरी ५० विद्यार्थीच हिंदी माध्यम निवडतात. त्यातही १० किंवा १५ जणच परीक्षेत उत्तीर्ण होतात. हिंदी माध्यमाच्या या स्थितीचे मोठे कारण परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. यात प्रश्न मूळ हिंदीत विचारले जात नाहीत, तर इंग्रजीतून यांचा क्लिष्ट अनुवाद असतो. परीक्षार्थी त्रस्त होतात. यापेक्षा असे वाटते की, इंग्रजीतच जास्त मेहनत केल्यास सोपे जाईल. बहुतांश उमेदवार आधीच्या वर्षांत विचारलेले प्रश्न पाहूनच इंग्रजी माध्यमाकडे जातात. उर्वरित निकालात मागे पडल्यानंतर माध्यम बदलतात.

-सी-सॅट पेपरमुळे झाले मोठे नुकसान
२०११ मध्ये प्राथमिक परीक्षेत सी-सॅटचा पेपर आला. सामान्यत: हिंदी माध्यमाचे परीक्षार्थी विज्ञान विषय घेणाऱ्यांच्या तुलनेत मागे राहिले. हिंदी माध्यमाचा निकाल कमी लागल्याने आंदोलन झाले. २०१५ मध्ये सी-सॅट क्वालिफाइंग झाले, पण तोपर्यंत हिंदीचे खूप नुकसान झाले होते.

हिंदी माध्यम का निवडावे
-२०१३ मध्ये सिलॅबस बदलला, हिंदीचे २५ जण निवडले. एकच आयएएस.
-२०१४ मधील परीक्षेतील यशस्वी ५% च हिंदीचे होते. सर्वोत्तम निशांत जैनची ऑल इंडिया रँकिंग १३वी होती.
-२०१५ च्या निकालात प्रमुख १०० च्या आत हिंदी माध्यमाचे फक्त २ होते.
-२०१६ च्या निकालात प्रमुख ५० च्या आत हिंदी माध्यमाचे तीनच यशस्वी.
-२०१७ मध्ये हिंदीवाले ५० ही निवडले नाहीत. सर्वोत्तमची रँक १४६वी होती.
-२०१८ मध्ये हिंदीतील सर्वोत्तमची रँकिंग ३३७ होती. दुसरी रँक ३३९ होती.

तर... वेगाने वाढणारी हिंदी ४३.६% लोकांची मातृभाषा
देशाच्या ५२.८ कोटी (४३.६%) लोकसंख्येची मातृभाषा हिंदी आहे. सुमारे १३.९ कोटींनी (११% पेक्षा जास्त) हिंदीला आपली दुसरी भाषा सांगितले. म्हणजे ५५% लोकांची मातृभाषा किंवा दुसरी भाषा हिंदी आहे. हिंदीचा विकासही वेगाने होत आहे. १९७१ ते २०११ दरम्यान हिंदी भाषिकांची संख्या २०.२ कोटींनी वाढून ५२.८ (१६१% वाढ) कोटी झाली. दुसरीकडे परीक्षा व मुलाखतीत इंग्रजीच्या दबावामुळे ही भाषा जाणणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळेच २००१ च्या जनगणनेत इंग्रजी बोलणारे २.६ लाख होते, तर २०११ मध्ये ८.३ कोटींनी याला दुसरी भाषा म्हणून चिन्हांकित केले.

शब्दांकन : देवेश व्यास

बातम्या आणखी आहेत...