आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदाच्या पावसामुळे जमीन पावसाने भरली आहे. मोसमी पावसादरम्यान भूजल पातळीत गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत चांगली वाढ झाली आहे. देशात ४३७.६ अब्ज घन मीटर भूजल पुनर्भरण झाले. यामध्ये २३९.१६ अब्ज घनमीटर(६१%) पाणी जमिनीतून सिंचन, पेयजल आणि औद्योगिक वापरासाठी काढले. ही बाब डायनेमिक ग्राउंड वॉटर रिसोर्स असेसमेंट ऑफ इंडिया-२०२२ च्या अहवालात समोर आली आहे. भूजल पुनर्भरणाची स्थिती २००४,२००९, २०११, २०१३, २०१७ आणि २०२० मध्ये वाढली होती. मात्र, २०१३ वगळता या वर्षी भूजल पुनर्भरण सर्वाधिक झाले. मात्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली व प.उत्तर प्रदेशच्या स्थितीत विशेष सुधारणा झाली नाही.
महाराष्ट्रासह १२ राज्यांत जमिनीच्या खाली जास्तीत जास्त १० मीटरवर सापडतेय पाणी : चांगल्या पावसामुळे १२ राज्यांतील बहुतांश भागात आता ५ ते १० मीटर खोल पाणी मिळत आहे.या राज्यांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, प. बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, तामिळनाडू, तेलंगण आणि कर्नाटक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.