आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशांतर्गत प्रवाशांनी आता नियोजित वेळेच्या साडेतीन तास आधी पोहोचावे, अशी अॅडव्हायझरी इंडिगोने मंगळवारी जाहीर केली. प्रवाशांना केवळ ७ किलो वजनी सामान बाळगण्याची परवानगी आहे. वाढत्या गर्दीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण चेक-इन व बोर्डिंगमध्ये विलंब लागतो. इमिग्रेशन काउंटरवर कर्मचारीही वाढवण्यात आले आहेत. विमानतळावर टी-१, टी-२ व टी-३ नावाचे तीन टर्मिनल आहेत. टी-३ टर्मिनलवर प्रवेशद्वारांची संख्याही १४ हून १६ करण्यात आली आहे. मंगळवारपासूनच हा निर्णय लागू होईल. येथून दररोज १२०० उड्डाणे होतात. १.९० लाख प्रवाशांना त्याचा लाभ होताे.
भाजी मंडईसारख्या गर्दीमुळे दिल्ली विमानतळाच्या श्रेणीतही घट गेल्या १० दिवसांत शेकडो यात्रेकरूंनी टर्मिनल-३ संबंधी तक्रारी दिल्या. {38% ने टॅक्सी, पिकअप, पार्किंगच्या समस्या वाटली. {38% लोकांना इंटर-टर्मिनल कनेक्टिव्हिटीची समस्या जाणवली. ३१ टक्के जणांचा सुरक्षा तपासणीचा अनुभव वाईट. {27% जणांना सामानाची प्रक्रिया मंद वाटली. {16% लोकांना चेक-इनमध्ये त्रास वाटला. १६ % टॉयलेट सुविधेवर नाराज.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.