आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील रायरंगपूर आणि ऊपरबेडा गावात सणासारखे वातावरण आहे. द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपतिपदाचा उमेदवार जाहीर केल्याने हा उत्साह आहे. टाटानगर-रायरंगपूर रोडवर मोहलडिहा वस्तीत मुर्मूंचे दुमजली घर आहे. रायरंगपूरहून १५ किमीवरील ऊपरबेडा गावात त्यांचे माहेर आहे. मुर्मूंच्या घराला सीआरपीएफने वेढा घातला आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे. बुधवारी मुर्मूंच्या घराबाहेर त्यांचे व्याही धर्माचरण हांसदा उभे होते. ते म्हणाले, घरात तर गेलो, पण भेटू शकलो नाही. आता आमच्या विहिणीच्या रूपाने देशाला पहिली आदिवासी राष्ट्रपती मिळणार आहे.
पूजेनंतर शुभ मुहूर्तावर दिल्लीला रवाना, उद्या अर्ज भरण्याची शक्यता
मुर्मूंनी सकाळी नारिंगी रंगाची साडी नेसून कडक सुरक्षा व्यवस्थेत आधी जाहेर येथे आणि नंतर शिवमंदिरात पूजा केली. सकाळी ११ ते दुपारी अडीचपर्यंत त्या घरी होत्या. तेव्हा आतपर्यंत जवान तैनात होते. कोणालाही भेटीचा वेळ मिळाली नाही. शुभ मुहूर्तावर लोकांना अभिवादन करत २.५६ वाजता निळी साडी परिधान करून दिल्लीला रवाना झाल्या. शुक्रवारी अर्ज दाखल करू शकतात. दरम्यान, बिजू जनता दलाने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मुर्मूंना पाठिंबा जाहीर केला. यामुळे निवडीचा मार्ग अधिक सुकर झाला.
ऊपरबेडाला बनवले डिजिटल गाव
ऊपरबेडा गाव पूर्ण डिजिटल आहे. प्रत्येक घराचे एक बँक खाते आवश्यक आहे. प्रत्येक घरात नळ आहे. सर्वांच्या घरात शौचालय आहे. प्रधानमंत्री आवास योजनाही झाली आहे. येथील लोक त्याचे संपूर्ण श्रेय मुर्मूंना देतात.
शाकाहाराच्या कट्टर समर्थक आहेत
मुर्मू शाकाहारी आहेत. झारखंडच्या राज्यपाल असताना त्यांनी राजभवनात मांसाहारावर पूर्ण बंदी घातली होती. मुर्मू आदिवासी, विद्यार्थ्यांसाठी काम करत आल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.