आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीयांसाठी सोने हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. जागतिक सोने परिषदेच्या (डब्ल्यूजीसी) नव्या अहवालाने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यंदा एप्रिल ते जून या कालावधीत असह्य उन्हाळा असूनही सोन्याची मागणी ४३ टक्के वाढली. या तीन महिन्यांत १७१ टन सोने मागणी होती. गतवर्षी याच तीन महिन्यांमध्ये ती केवळ १२० टन होती. दागदागिन्यांच्या मागणीतही ४९ टक्के वाढ होऊन ती १४०.३ टन होती. गतवर्षी या तुलनेत ही मागणी केवळ ९४ टन होती. तथापि, जागतिक पातळीवरही गतवर्षी सोन्याच्या मागणीत ८ टक्के घट नोंदवली गेली. गतवर्षी ९४८.४ टन मागणी होती, तर सन २०२१ मध्ये याच कालावधीत ती १०३१.८ टन होती. डब्ल्यूजीसी भारताचे सीईओ पी.आर. सोमसुंदरम यांच्या मते, यंदा जून महिन्यात अक्षय्य तृतीयेसोबतच लग्नसराई होती. त्यामुळे देशांतर्गत मागणी वाढली. त्याशिवाय अस्थिर शेअर बाजार, वाढती महागाई, मंदीची चर्चा पाहता सोने खरेदीकडे कल वाढला आहे.
पुढील महिन्यापासून सणांमुळे सराफा बाजाराला झळाळी येण्याची अपेक्षा
सोन्याची आयात नियंत्रित करण्यासाठी जुलैत सरकारने आयात शुल्क वाढवले होते. त्यामुळे दरांतील तेजी संपली. दागिन्यांची मागणी वाढणे म्हणजे किरकोळ खरेदी सुरू आहे. त्यामुळे पुढील ३ महिन्यांत मागणी सुधारण्याची अपेक्षा आहे. ऑगस्टमध्ये सण सुरू होत आहेत. तथापि, आयातीवर महागाई, रुपया-डॉलरचे मूल्य आणि धोरणात्मक उपायांचा परिणाम दिसू शकतो. देशांतर्गत बाजारात सोने ५१ हजार रु./१० ग्रॅम आहे. पुढील तीन महिन्यांत ते ५३,५०० ते ५४,००० राहू शकते.
- दर ३ आठवड्यांच्या उच्चांकावर : अमेरिकी केंद्रीय बँक फेडरल रिजर्व्हने व्याज दर धीम्या गतीने वाढवण्याचे संकेत दिले. त्यानंतर भारतात सोने ३ आठवड्यांच्या उच्चांकावर गेले. एमसीएक्समध्ये वायदा भाव ५१,५३० रु./१० ग्रॅम झाला.
देशाच्या पहिल्या गोल्ड स्पॉट एक्स्चेंजची सुरुवात आज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी सुरतमध्ये देशाचे पहिले गोल्ड स्पॉट एक्स्चेंज सुरू होईल. त्यामुळे सोन्याचा व्यवसाय वाढण्यास आणि त्यात पारदर्शकता आणण्यास मदत मिळेल. हे एक्स्चेंज गुजरातच्या गिफ्ट (गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक) सिटीमध्ये आहे. हे एक्स्चेंज शेअर बाजाराप्रमाणेच काम करेल. त्यामुळे सराफा व्यावसायिक, रिफायनर किंवा किरकोळ गुंतवणूकदारही सोने खरेदी करू शकतील.
दृष्टिक्षेपात सोने
22,000 टन सोने भारतीयांजवळ घरांत ठेवलेले आहे.
65.11 टन सोने खरेदी केले आरबीआयने 2021-22मध्ये.
760.42 टन सोने आरबीआयकडे साठा स्वरूपात.
भारतात एप्रिल ते जून या कालावधीत सोन्याची मागणी ४३%, दागिन्यांची ४९% वाढली; जगात मात्र मागणीत ८% घट
जागतिक सुवर्ण परिषदेचा अहवाल
गुंतवणूक: भारतात एप्रिल-जूनमध्ये २०% वाढून ३० टन झाली. गेल्या वर्षी याच काळात होती २५ टन.
आयात: ३४% वाढून १७० टन झाली. एप्रिल-जून २०२१ मध्ये आयात फक्त १३१.६ टन होती.
पुनर्वापर: १८% वाढून २३.३ टन झाला. गेल्या वर्षी याच काळात तो १९.७ टन होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.