आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकी हवामान खात्यानुसार, प्रशांत महासागरात सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० पासून ला-निना प्रभाव दाखवू शकते. त्याच्या प्रभावामुळे यंदा भारतात मान्सून उशिरा परतू शकतो व पाऊसही सप्टेंबरमध्ये जास्त होऊ शकतो. त्यामुळे थंडीचा प्रभाव दक्षिणेतील राज्यांतही दिसू शकतो. अल-निनो व ला- निना या दोन्ही स्थिती हवेच्या विषम व्यवहारामुळे पृष्ठभागाचे तापमान बदलल्याने निर्माण होतात. अल-निनोमध्ये हवेचा जोर कमी होतो आणि उष्णता निर्माण करते. तर ला-निनामध्ये हवा मजबूत असते व थंडी निर्माण करते. दोन्हीही स्थिती आपल्या हवामानावर प्रभाव टाकतात. अल-निनोदरम्यान मध्य व भूमध्यीय प्रशांत सागर गरम होतो, यामुळे भूमंडळाच्या हवेचा पॅटर्न बदलतो. यामुळे आफ्रिकेसपासून भारत आणि अमेरिकेपर्यंत हवामान प्रभावित होते. अल-निनोच्या स्थितीत भारतात मान्सून अनियमित होतो व दुष्काळ पडतो, तर ला- निनोमध्ये मान्सूनमध्ये जास्त पाऊस होतो व ठिकठिकाणी पूर येतो. एक अल-निनो किंवा ला-निनो एपिसोड ९ ते १२ महिन्यांपर्यंत असतो. त्याची आवृत्ती दोन ते सात वर्षे अाहे. अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ रघू मुर्तुग्दे यांच्या मते, मध्य भारत व पश्चिम किनाऱ्यांवर सध्या सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. मात्र, ला-निना स्थिती निर्माण झाल्याने आता ऑगस्टचे उर्वरित दिवस आणि सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर सर्वाधिक पावसाचा महिना होऊ शकतो आणि त्यामुळे मान्सून परतण्यास उशीर होऊ शकतो. ला-निना भारतातील थंडीवर प्रभाव टाकू शकतो. यामुळे उत्तर-दक्षिणमध्ये कमी दाबाचा पट्टा होतो. त्यामुळे सैबेरियाई हवा येथे पोहोचतील व भारताच्या दक्षिणेपर्यंत परिणाम दाखवतात. ज्या वर्षांत ला-निना बनतो त्या वर्षांत महाबळेश्वरमध्ये गारा पडतात व तामिळनाडूतील डोंगराळ भागात गार हवा सुटते. पुणे येथील हवामान खात्याचे शास्त्रज्ञ डॉ. डी. एस. पै यांच्यानुसार, ला-निनाची शक्यता आम्ही खूप आधी व्यक्त केली होती. सप्टेंबरच्या उत्तरार्धात १०४% पावसाची शक्यता दिसते.
स्टडी : १९९४ पासून पृथ्वीवरून २८ लाख कोटी टन बर्फ विरघळला
ब्रिटिश शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, १९९४ पासून आतापर्यंत पृथ्वीच्या पृष्ठभागावरून एकूण २८ लाख कोटी टन विरघळला आहे. डोंगर-ग्लेशियरवरून बर्फ विरघळल्याने पृथ्वीच्या सौर किरणास पुन्हा अंतराळात परावर्तित करण्याची क्षमता कमी होत आहे. बर्फाखालील काळे डांेगर उष्णता शोषून घेत आहेत, यामुळे जमीन व समुद्र दोन्हींचे तापमान वाढत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.