आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Due To The Lies Of Social Media, There Were Fights In The Village, To Stop This, The Library Was Opened

मंडे पॉझिटिव्ह:सोशल मीडियामुळे गावात होत होती भांडणे, ती रोखण्यासाठी ग्रंथालय उघडले, येथेच खरी माहिती मिळत असल्याची करून देताहेत जाणीव

डेहराडून / मनमीत14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हॉट्सॲप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोट्या माहितीचे भांडार आहे. यापासून तरुण पिढीचे सर्वाधिक नुकसान होत आहे. त्यांना या अर्धवट आणि काल्पनिक ज्ञानापासून वाचवण्यासाठी हिमालयाच्या कुशीतील पौडी जिल्ह्यातील कॅबर्स गावात ग्रंथालय उघडले गेले, जेणेकरून मुले आणि युवक पुस्तके वाचून वास्तविक आणि सत्य वाचून खऱ्या आणि खोट्यातील फरक जाणून घेतील. गावचे प्रमुख कैलाश सिंह म्हणाले, महामारीत ५६ तरुण गावात परतले होते. दरदिवशी त्यांच्यात सोशल मीडियावर येणाऱ्या संदेशांवरून वाद होत होता. अनेकदा कडाक्याचे भांडणही झाले. गावातील लोकांचा या असत्य, अर्धवट आणि भ्रामक माहितीपासून बचाव करण्यासाठी ते ग्रंथालय सुरू करत आहेत. यामुळे ते प्रामाणिक गोष्टी ओळखू शकतील आणि आपले विचार सुधारतील. यासाठीच त्यांना पुस्तकाची गोडी लागणे गरजेचे आहे. येणारा काळा हा इंटलेक्ट आणि डेटा युग आहे. लोकांना त्या पद्धतीने तयार राहावे लागणार आहे. जगातील प्रत्येक मोठ्या व्यक्तीने पुस्तकांपासूनच उच्च पद मिळवले.

या ग्रंथालयात हँडपिक्ड वर्ल्ड लिटरेचरसह हिंदीतील प्रसिद्ध पुस्तकांचे संकलन आहे. बाल साहित्याला विशेष स्थान दिले गेले. प्रगतिशील पुस्तक केंद्र आणि मुस्कान उत्तराखंडने हे ग्रंथालय तयार करण्यासाठी आपली टीम पाठवली. टीमचे सदस्य कुलदीप म्हणाले, “ग्रंथालयात पर्यावरण आणि शेतीविषयक पुस्तकेही आहेत. यामुळे लोकांना परिस्थितीचे तंत्र समजेल. सस्टेनबल टुरिझमसाठी पर्यावरण सुरक्षा ही पहिली अट आहे. त्याविषयी पुस्तकांतूनच जागरूकता येईल. विज्ञानाची आवड निर्माण करण्यासाठी ज्ञान-विज्ञान समितीची पुस्तके ठेवली आहेत. विविध देशांतील साहित्य आणि उत्कृष्ट संकलनही आहे. यामुळे जगभरातील संस्कृती कळेल. पडीक घरे राहण्याजोग्या बनवून व्हिलेज टुरिझमला चालना देत आहोत.

अर्थकारणातील सहभागासाठी तरुणांना व्हिलेज टुरिझम व परफॉर्मिंग आर्ट््सचे धडे
गाव प्रमुखांनी सांगितले,‘आम्ही इतिहासाला वर्तमानाशी जोडून टुरिझमचे एक सस्टेनेबल मॉडलही तयार करत आहोत. यासाठी लॉकडाऊनमध्ये नोकरी गमावलेल्या तरुणांसोबत परफॉर्मिंग आर्टला गावाशी जोडत आहोत. यामुळे व्हिलेज टुरिझमद्वारे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करू शकतील. गावात परफॉर्मिंग आर्ट सबळ करण्यासाठी प्रयोगही केले जात आहेत. नुकतेच प्रसिद्ध रशियन कथाकार अन्तोन चेखव यांच्या कथेवर आधारित नील सिमोनच्या नाट्य रूपांतरणाचे अडॉप्टेशन कॉमेडी म्युझिकल प्ले ‘ये क्या मजाक है’ चे सादरीकरण केले गेले.

बातम्या आणखी आहेत...