आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Due To The Negligence Of The States, The Pace Of The Scheme Of Buying And Selling Farmers' Produce Has Slowed Down

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ई-एनडब्ल्यूआर:राज्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन शेअरप्रमाणे खरेदी-विक्री करणाऱ्या योजनेचा वेग मंदावला

नवी दिल्ली (शरद पांडेय)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3 वर्षांपूर्वी सुरू झाली होती ईएनडब्ल्यूआरची व्यवस्था, एक्स्चेंजवर ट्रेडिंग, कर्जही घेता येईल
  • 64 हजारांपैकी 1801गोदामांचाच आतापर्यंत या योजनेत सहभाग

शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या निगोशिएबल वेअरहाउसिंग रिसिप्टी स्कीम (ई-एनडब्ल्यूआर) राज्यांच्या निरुत्साहामुळे गती घेत नसल्याचे दिसते. देशातील सुमारे ६४ हजार वेअरहाऊसपैकी १८०१ आतापर्यंत त्यात सहभागी झाले आहेत. यातही ७०% म्हणजे १२६७ गोदाम केवळ तामिळनाडू व मध्य प्रदेशातील आहेत.

केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१७ मध्ये योजना सुरू केली होती. या अंतर्गत गोदामात जमा पिकांच्या पावतीला डिजिटल बनवण्यात आले होते. या डिजिटल पावतीलाच ई-एनडब्ल्यूआर म्हणतात. यात गोदामातील सर्व पिकांचा तपशील असतो. या पावतीला शेतकरी कोणत्याही व्यापाऱ्याला थेट किंवा एनसीडीईएक्स सारख्या एखाद्या कमोडिटी एक्स्चेंजच्या माध्यमातून विकू शकतात. या यादीचा मालक गोदामात ठेवलेल्या मालाचा मालक होतो. म्हणजे एखाद्या व्यापाऱ्याने शेतकऱ्याकडून ई-एनडब्ल्यूआर विकत घेतली तर तो गोदामात जाऊन माल घेऊ शकतो. शेतकरी ई-एनडब्ल्यूआर तारण ठेऊन बँकेकडून कर्जही घेऊ शकतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी या योजनेला क्रांतिकारी मानले जात होते. मात्र, केवळ दोन राज्ये तामिळनाडू आणि मध्य प्रदेशानेच याचा लाभ घेतला. तामिळनाडूने गेल्या तीन वर्षांत ८१५ आणि मध्य प्रदेशने ३१५ गोदामांना या योजनेत सहभागी केले आहे. उर्वरित कोणत्याही राज्यात १०० गोदाम देखील या योजनेत सहभागी झाले नाहीत. देशातील सर्वात मोठे राज्य यूपीत आतापर्यंत केवळ ४५ गोदामे यात सहभागी झाली. ई- एनडब्ल्यूआर देण्यासाठी गोदामांना ही योजना राबवणाऱ्या वेअरहाउसिंग डेव्हलपमेंट अँड रेग्युलेटरी अथॉरिटीत (डब्ल्यूडीआरए) नोंदणी करावी लागेल. नोंदणीसाठी त्यांना डब्ल्यूडीआरएच्या गुणवत्तेशी संबंधित अटींचे पालन करावे लागेल.

ई-एनडब्ल्यूआरचे फायदे

  • पिक गोदामात जमा करुन ई- एनडब्ल्यूआर घेतल्यानंतर ती डीमॅटमध्ये रुपांतरीत होते. ती एनसीडीईएक्स सारख्या एक्सजेंच द्वारे देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात विकू शकता.
  • ई-एनडब्ल्यूआर बँकेत तारण ठेऊन कर्ज घेऊ शकता. फायदा असा अाहे की, पिकाची किंमत घटली तर कर्ज घेऊन खर्च भागवता येईल, मग किंमत वाढल्यावर विकून कर्ज फेडायचे.
  • ई-एनडब्ल्यूआर देणाऱ्या गोदामातून गरजेनुसार आवश्यक तेवढा माल काढता येईल. तर सामान्य गोदामात पुर्ण माल एकाच वेळी काढावा लागतो.

नोंदणी वेगाने करावी लागेल
डब्ल्यूडीआरएचे चेअरमन पी. श्रीनिवास सांगतात की, ई- एनडब्ल्यूआरमध्ये इतर राज्यांनाही तामिळनाडूसारखी गती आणावी लागेल. गुजरात, उप्र, हरियाणाने रस दाखवला आहे. आंध्र व तेलंगाणात ३५ गाेदामांना ई- एनडब्ल्यूआरचा बाजार जाहीर केले आहे. येथे ई- एनडब्ल्यूआरची खरेदी-विक्री होते. नोंदणीत गती आणण्याचे प्रयत्न होत आहेत.

डब्ल्यूडीआरए नोंदलले गोदाम ई- नाम योजनेशी लिंक आहेत. शेतकरी किंवा व्यापारी गोदामाची पावती घेऊन घरी बसूनच कोठेही माल विकू शकतो. ते फ्यूचर मार्केटमध्ये विकता येऊ शकते. -पी. श्रीनिवास, चेअरमन, डब्ल्यूडीआरए

एक्स्चेंजमधून देशात काेठेही विकू शकता ईएनडब्ल्यूआर

2.35 लाख ईएनडब्ल्यूआर जारी केले आहेत. । 17.3 लाख टन पीकांना डीमॅटमध्ये बदलले आहे. 815 सर्वाधिक गोदामे तामिळनाडूूत योजनेशी संबंधित