आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dung Gas In Gujarat, First Project In The Country To Convert To CNG; CNG To Be Sold At Market Price

देशातील पहिला प्रकल्प:गुजरातमध्ये गोबर गॅस, सीएनजीमध्ये बदलण्याचा देशातील पहिला प्रकल्प; बाजारभावाने विकणार सीएनजी

विमुक्त दवे | अहमदाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 40 हजार किलो शेण आजही दररोज लागते, एक रुपया किलो दराने विकत घेणार शेण

गुजरातच्या बनास डेअरीमध्ये गोबर गॅसचे सीएनजीमध्ये रूपांतर करणारा देशातील पहिला प्रकल्प उभारण्यात येत आहे. सुमारे ८ कोटी रुपये खर्चाचा सीएनजी प्रकल्प याच आठवड्यापासून सुरू होत आहे. बनास डेअरीचे कामराज चौधरी यांनी सांगितले, ‘सीएनजी स्टेशन बनासकाठाच्या धामा गावाजवळ डिसा-थराह रोडवर उभारण्यात येत आहे. प्लँटसाठी आता दररोज ४० हजार किलो शेण लागते. आम्ही एक रुपया किलो दराने शेण विकत घेत आहोत. या प्रकल्पात २ हजार घनमीटर कच्चे बायोगॅस तयार होते आहे. यातून ८०० किलो सीएनजी मिळते. या गॅसवर गरजेप्रमाणे प्रक्रिया करून सिलिंडरमध्ये भरून सीएनजी स्टेशनपर्यंत पाठवण्यात येतो. सीएनजी बाजारभावाने विकले जाते. प्रकल्पात खराब झालेल्या बटाट्यापासूनही गॅस तयार करण्यात येत आहे.’

दुधाप्रमाणे दर पंधरवड्यास पैसे देणार

बनास डेअरीचे एमडी कामराज चौधरी यांनी सांगितले, प्लँटजवळ १२ गावांतील २५४ पशुपालकांकडून शेण विकत घेण्यासाठी दररोज ट्रॅक्टर-ट्राॅली पाठवत आहोत. दुधाप्रमाणे १५ दिवसांनी त्या शेणाचे पैसेही देतो. गुजरातमध्ये २५-३० गावांत गोबर गॅस प्लँट उभारण्याची योजना आखत आहोत.

बातम्या आणखी आहेत...