आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मंगळवारी चक्क शेणाचा ढीगारा साफ केला. त्यांची ही कृती पाहून भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही त्यांना हातभार लावला. यामुळे अवघ्या 30 मिनिटांतच एक ट्रॉलीभर शेण उचलण्यात आले. या प्रकरणी स्मृतींची मोठी प्रशंसा होत आहे.
वृद्ध महिला म्हणाली होती -मुलीचे लग्न आहे
स्मृती इराणी मंगळवारी भीम नगर सुअर बडवा भागात स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी तेथील एका आजीने त्यांना आपल्या घरापुढील शेणाचा ढीग उचलण्याची विनंती केली. त्या म्हणाल्या -'माझ्या घरासमोरील अंगणात माझ्या मुलीचे लग्न होणार आहे. पण, काही गोपालकांमुळे त्या मैदानात शेणाचा ढीग तयार झाला आहे. हा ढीग तेथून काढला तर खूप चांगले होईल.'
स्मृती म्हणाल्या -शुभ कार्याला उशीर कशाला?
आजीची समस्या ऐकून स्मृती इराणी म्हणाल्या -'शुभ कार्याला उशीर कशाला? आम्ही सर्वजण मिळून हा ढिगारा साफ करू.' त्यानंतर स्वतः पुढाकार घेत त्यांनी फावडे हाती घेतले. त्यांची ही कृती पाहून तिथे उपस्थित भाजपचे नेते व कार्यकर्तेही पुढे सरसावले. या सर्वांनी खोरे व टोपले हातात घेऊन शेणाचा ढिगारा साफ केला. यामुळे गत अनेक महिन्यांपासून साचलेला हा ढीग काही मिनिटांतच गायब झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.