आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सव:कोलकात्यात उद्यापासून उघडणार दुर्गामंडप; त्याआधी खरेदीची लगबग, दुर्गापूजेत 450 कोटींचे दागिने

कोलकाता / कुंदनकुमार चौधरी, संदीप नाग9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुर्गापूजेसाठी प्रसिद्ध प. बंगाल आता फेस्टिव्ह मूडमध्ये आला आहे. शनिवारी येथील दुर्गामंडप उघडण्यास सुरुवात होणार आहे. त्याआधीच लोकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे. सव्वा कोटीच्या लोकसंख्येच्या कोलकात्यात २ वर्षांनंतर बाजार कोरोनाच्या आधीच्या स्थितीप्रमाणे बहरला आहे. न्यू मार्केट, गोडिया हाट, श्याम बाजार, हाथी बगान, बेहाला, बडा बाजारासोबत मॉलमध्येही मोठी गर्दी आहे. हिंदूच नव्हे तर मुस्लिमांसह अन्य धर्मीयही कपड्यांपासून होम डेकोरपर्यंत या वेळी खरेदी करतात.

न्यू मार्केट ट्रेडर्स असोसिएशन अँड जॉइंट ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोककुमार गुप्ता यांनी सांगितले की, या वेळी १० हजार कोटींची कपडे खरेदी होण्याची शक्यता आहे. बीबी गांगुली रोडवरील बोबाजार जगातील असा एकमेव बाजार आहे, जिथे रस्त्यांच्या दुतर्फा ३५० पेक्षा जास्त सोन्या-चांदीची दुकाने आहेत. बंगीय सुवर्ण शिल्पी समितीचे सरचिटणीस सुब्रतो कर म्हणाले, सोन्याची खरेदी सुरू झाली आहे. यंदा ३५० कोटी रुपयांपेक्षा जास्त दागिने विकण्याची अपेक्षा आहे.

साडीऐवजी कुर्ती, सलवार सुटाला पसंती
बंगालच्या महिलांचे साडीप्रेम जगजाहीर आहे. व्यापारी गुप्ता म्हणाले, काही वर्षांत साडीऐवजी सलवार सूट आणि कुर्तीची खरेदी वाढली आहे.

बातम्या आणखी आहेत...