आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाळा : १ वर्षात ५२१ सरकारी बंद, ३३०४ नव्या खासगी सुरू
नवी दिल्ली | देशात एका वर्षात ५२१ सरकारी शाळा बंद पडल्या, तर सहा पटीने जास्त म्हणजे ३,३०४ खासगी शाळा नवीन उघडल्या. शालेय शिक्षण विभागाच्या यूडीआयएसई (युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टिम फॉर एज्युकेशन) अहवालात हे स्पष्ट झालेे. २०२०-२१ मध्ये १०,३२,०४९ सरकारी व ३,४०,७५३ खासगी शाळा होत्या, तर २०१९-२० मध्ये १०,३२,५७० सरकारी आणि ३,३७,४४९ खासगी शाळा होत्या.
ओडिशात बहुतांश सरकारी शाळा बंद होत्या. तेथे २०१९-२० मध्ये ५३,२६० शाळा होत्या. ज्या २०२०-२१ मध्ये ५०,२५६ राहिल्या.
- इंटरनेट : २०२०-२१ मध्ये २४.५% शाळांमध्ये पोहोचले. २०१९-२० मध्ये ते फक्त २२.३% होते. - वीज : २०१९-२० मधील ८३.४% च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये एकूण ८६.९% शाळांना कनेक्शन मिळाले. - ग्रंथालय : २०२०-२१ मध्ये ८२.९% शाळांमध्ये होते. २०१९-२० मध्ये ते २२.३% शाळांतच होते.
विद्यार्थी : नवीन प्राथमिक प्रवेश कोरोनामुळे २९ लाखांनी कमी
२०२०-२१ मध्ये देशातील कोरोना उद्रेकाचा सर्वात वाईट परिणाम लहान मुलांच्या शिक्षणावर झाला. पूर्व प्राथमिक वर्गांमध्ये २९ लाख कमी प्रवेश झाले. २०१९-२० मध्ये जिथे १,३५,५५,८९२ मुलांनी प्रवेश घेतला होता तिथे २०२०-२१ मध्ये ही संख्या १,०६,४५,५२६ पर्यंत कमी झाली. त्यापैकी २२.२८ लाख कमी प्रवेश हे खासगी शाळांतील पूर्व प्राथमिकमध्ये झाले, तर सरकारी शाळांमध्ये ३.१० लाख प्रवेश घटले. तथापि, पहिली ते १२ वीपर्यंत २०१९-२० कमी झालेली प्रवेश संख्या ७७,५८८
इतकीच आहे.
... पण शिक्षण साेडणारे कमी
- २०२०-२१ मध्ये १ ते ५वीपर्यंत ०.८%, ६-८ पर्यंत १.९% आणि ९-१० वी पर्यंत १४.६% विद्यार्थी घटले
- २०१९ मध्ये, १-५वीपर्यंत १.५%, ६-८ पर्यंत २.६% आणि ९-१०वीपर्यंत १६.१% विद्यार्थी गळती होती.
- शिक्षण मध्येच सोडून देण्यात १-५वी आणि ९वी ते १० वीत मुले अधिक, ६-८ वीत मुली अधिक.
मुस्लिम मुलांचे प्रवेश वाढले
२०२०-२१ मध्ये १-१२ वीच्या नवीन प्रवेशांमध्ये मुस्लिम मुलांचा वाटा १४.२६% वर पोहोचला, जो २०१९-२० मध्ये १३.९५% होता.
शिक्षक : दोन वर्षांत २.४ लाख महिला, ३० हजार पुरुष वाढले
देशात दोन वर्षांत शिक्षिकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. २०२०-२१ मध्ये, १-१२वीपर्यंत, ४९.५ लाख शिक्षिका वाढल्या, तर शिक्षक ४७.५ लाख झाले. २०१८-१९ मध्ये ४७.२ लाख शिक्षक आणि ४७.१ लाख शिक्षिका होत्या. अहवालानुसार, २०१९-२० च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये २.४ लाख शिक्षिका वाढल्या. ३० हजार शिक्षक वाढले. एकूण ९६.९६ लाख शिक्षक होते, जे २०१९-२० मध्ये ९६.८७ लाख होते. २०२०-२१ मध्ये देशात पहिली ते ५ वीपर्यंत प्रत्येक २६ मुलांमागे एक शिक्षक होता, तर २०१९-२० मध्ये हे प्रमाण २६.५ होते.
टॉप-3 राज्यांत शिक्षिका जास्त
राज्य शिक्षक शिक्षिका
तामिळनाडू १,४२,६३७ ४,२८,७४३
केरळ ५७,७३७ २,१७,२३५
पंजाब ६७,१९३ २,११,८८१
टॉप-3 राज्यांत शिक्षक जास्त
राज्य शिक्षक शिक्षिका
उत्तर प्रदेश ८,१२,५७५ ६,७५,११२
राजस्थान ४,५५,७०५ २,९९,९६८
महाराष्ट्र ३,९८,६४४ ३,६८,२७२
देशात ३६ पैकी २० राज्यांत शिक्षिका जास्त (शिक्षक संख्या : २०२०-२१ या वर्षातील आकडेवारी)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.