आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • During Online Studies Minor Girl Started Posting Her Private Videos On Social Media In Ahmedabad; News And Live Updates

पालकांनो लक्ष द्या:ऑनलाइन अभ्यासादरम्यान अल्पवयीन मुलीने सोशल मीडियावर शेअर केला न्यूड व्हिडिओ; पालकांना कळताच आला हद्यविकाराचा झटका

अहमदाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलांच्या कमेंट्सनंतर दररोज बनवायची व्हिडिओ

ही बातमी त्या पालकांसाठी चिंतेची बाब आहे, ज्यांचे मुले ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करतात. असाच एक धक्कादायक प्रकार गुजरातमधील अहमदाबादमधून समोर आला आहे. एका 15 वर्षीय मुलीने ऑनलाईन अभ्यासादरम्यान सोशल मीडियावर आपला न्यूड व्हिडिओ शेअर केला आहे. हा सगळा प्रकार त्यांच्या पालकांच्या लक्षात येताच दोघाना हदृयविकाराचा झटका आला. दरम्यान, नातेवाईकांनी मुलीच्या समुपदेशनासाठी हेल्पलाईची मदत घेतली आहे.

अभ्यासासाठी दिले होते नवीन मोबाईल
पालकांनी हेल्पलाइनला सांगितले की, ऑनलाईन अभ्यासासाठी मुलीला नवा मोबाईल विकत घेऊन दिला. पण मुलगी घरात एकटी राहत असल्याने तीला मोबाईलचे वेगळे वळण लागले. ती सदैव मोबाईलमध्ये व्यस्त राहायची. आई-वडील दोघेही नोकरी करतात. या दरम्यान, ती सोशल साइट्सद्वारे अशा लोकांच्या संपर्कात कशी आली की तिने स्वतःचे न्यूड व्हिडिओ अपलोड करण्यास सुरुवात केली असे पालकांनी हेल्पलाईनला सांगितले.

मुलांच्या कमेंट्सनंतर दररोज बनवायची व्हिडिओ
अल्पवयीन मुलीने समुपदेशनादरम्यान सांगितले की, तीने सोशल मीडियावर काही मुलींचे नग्न व्हिडिओ पाहिले. यामध्ये, अनेक मुली दररोज त्यांचे अश्लील व्हिडिओ अपलोड करत असत. मुलांकडून या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत असत. त्या सर्व कमेंट्स वाचून ती टिप्पणी करायची. त्यामुळे तीदेखील असेच व्हिडिओ तयार करत सोशल मीडियावर अपलोड करायची. नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर ही बाब समोर आली.

बातम्या आणखी आहेत...