आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनसीपीसीआरचे शपथपत्र:कोरोना काळात 30071 मुले अनाथ, 3621 जणांनी माता-पित्यांचे छत्र गमावले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 26,176 जणांनी माता-पिता यापैकी एक गमावले, 274 जणांना कुणीच आधार नाही

राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) सुप्रीम कोर्टात दिलेल्या आकडेवारीनुसार देशभरात कोरोनाकाळात ३०,०७१ मुले अनाथ झाली आहेत. यात २६,१७६ मुलांनी आई आणि वडील यापैकी एक छत्र गमावले असून ३,६२१ मुले पूर्ण अनाथ झाली आहेत. तर, २७४ मुले अशी आहेत ज्यांना त्यांच्या नातेवाईकांनीही वाऱ्यावर सोडले आहे. एनसीपीसीआरने सोमवारी कोर्टात याबाबत दिलेल्या शपथपत्रात म्हटले आहे की, १ एप्रिल, २०२० पासून ५ जून २०२१ पर्यंत आकडेवारी बाल स्वराज पोर्टलवर आहे. मात्र, या पोर्टलवर मृत्यूचे कारण देण्यात आलेले नाही. आयोगाने नमूद केले की, अनाथ मुलांमध्ये १५,६२० मुले, १४,४४७ मुली आणि ४ मुले तृतीयपंथी आहेत.

कोणत्या वयोगटातील किती मुले

  • वर्षे-मुले
  • 0-3 वर्ष 2,902
  • 4 ते 7 वर्ष 5,107
  • 8 ते 13 वर्ष 11,815
  • 14 ते 15 वर्ष 4,908
  • 16 ते 17 वर्ष 5,339

सुप्रीम कोर्टाचा आदेश- बेकायदा मुलांना दत्तक घेणाऱ्या संस्थांवर राज्यांनी कारवाई करावी
कोरोनाकाळात अनाथ झालेल्या मुलांच्या देखभालीबाबत मंगळवारी सुप्रीम कोर्टाने लेखी आदेश दिला. न्या. एल. नागेश्वर राव व न्या. अनिरुद्ध बोस यांच्या पीठाने बेकायदा मुलांना दत्तक घेणाऱ्या संस्था व लोकांची ओळख पटवून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले. एनसीपीसीआरने सोमवारी मुलांना अवैधरीत्या दत्तक घेतले जात असल्याचा उल्लेख कोर्टात केला होता. कोर्टाने अशा मुलांना दत्तक देण्याबद्दलची जाहिरात देणे बेकायदा असल्याचे स्पष्ट करून संेट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीच्या सहभागाशिवाय दत्तक घेण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे नमूद केले. तसेच अशा मुलांची ओळख सांगून त्यांना दत्तक देण्याच्या मोबदल्यात इच्छुक लोकांकडून पैसे उकळण्यावर बंदी घालण्याचेही निर्देश दिले.

बातम्या आणखी आहेत...