आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी दिल्लीतील एम्समधये कोरोनाची लस घेतली. यावेळी त्यांनी आपल्या मिश्खिल शैलीने वातावरणाला नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वजण हसू लागले. जाणून घ्या नेमके काय झाले...
मोदी सोमवारी सकाळी व्हॅक्सीन घेण्यासाठी एम्समध्ये दाखल झाले. यावेळी पद्दुचेरीच्या नर्स पी निवेदा ड्यूटीवर होत्या. निवेदा यांनी मोदींना भारत बायोटेकची व्हॅक्सीन दिली. निवेदाला असिस्ट करण्यासाठी केरळच्या नर्स रोसम्मा अनिल होत्या. या दोन्ही नर्स मागील काही वर्षांपासून एम्समध्ये काम करत आहेत.
पंतप्रधान एम्समध्ये येणार असल्याचे ऐनवेळी रुग्णलय स्टाफला सांगण्यात आले होते. यामुळे रुग्णालयात वातावरण गंभीर बनले होते. मोदींना माहित होते की, त्यांच्या येण्यामुळे स्टाफ तनावात आहे. या वातावरणाला नॉर्मल करण्यासाठी त्यांनी नर्सला बोलणे सुरू केले. यावेळी पंतप्रधानांनी त्यांना आपले नाव विचारले आणि इतर माहिती विचारली.
यावेळी पंतप्रधानांनी मस्करीत विचारले, वेटरनरीमध्ये वापरणाऱ्या सुईचा वापर करणार आहात का ? नर्स नाही म्हणाल्या, पण त्यांना समजले नाही की, पंतप्रधान असे का बोलत आहेत ? यानंतर मोदी म्हणाले- ‘नेत्यांचे कातडे जाड असते, यामुळे विचारतोय की, विशेष सुई असते का ?’ इतके ऐकताच तिथे उपस्थितांना हसू आवरले नाही. यानंतर मोदींनी त्या दोन्ही नर्ससोबत फोटो काढले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.