आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 गायींसाठी मध्यरात्री उघडले द्वारकाधीश मंदिर:मालकाने लम्पी व्हायरसपासून बरे करण्याचा केला होता नवस, कच्छहून द्वारकेल्या पोहोचल्या

द्वारका2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
या गायी आपल्या मालकांसह 450 किमीची पदयात्रा करून कच्छहून बुधवारी सायंकाळी द्वारकेला पोहोचल्या होत्या. 

भगवान श्रीकृष्णाची नगरी द्वारकेच्या इतिहासात कदाचित प्रथमच द्वारकाधीश मंदिराचे दरवाजे मध्यरात्री उघडण्यात आले. हो, बुधवारी रात्री असे घडले. मंदिराची कवाडे कुण्या VIPसाठी नव्हे तर 25 गायींसाठी उघडण्यात आली. या गायी आपल्या मालकासह 450 किमी अंतर कापत कच्छहून द्वारकेला पोहोचल्या होत्या.

प्रथम जाणून घेऊ, असे का घडले

कच्छच्या महादेव देसाई यांच्या गोशाळेच्या 25 गायींना 2 महिन्यांपूर्वी लम्पी व्हायरस झाला होता. त्यावेळी सौराष्ट्रात लम्पी व्हायरसमुळे शेकडो गायींचा बळी गेला होता. त्यावेळी महादेव यांनी आपल्या गायी बऱ्या झाल्या तर गायींसह दर्शनाला येईल, असा नवस भगवान द्वारकाधीश यांच्याकडे केला होता.

मंदिरातील दर्शनाचा व्हिडिओ
मंदिरातील दर्शनाचा व्हिडिओ

आता परिक्रमा व प्रसाद ग्रहण करणाऱ्या गायींचे 3 फोटो

बुधवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास गायी पोहोचल्या.
बुधवारी मध्यरात्री 12 च्या सुमारास गायी पोहोचल्या.
भगवान द्वारकाधीशांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराची परिक्रमा केली.
भगवान द्वारकाधीशांचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराची परिक्रमा केली.
दर्शनानंतर गायींनी द्वारकाधीशांचा प्रसाद ग्रहण केला.
दर्शनानंतर गायींनी द्वारकाधीशांचा प्रसाद ग्रहण केला.

भाविकांचा त्रास टाळण्यासाठी मध्यरात्री उघडले मंदिर

मंदिर प्रशासनापुढे सर्वात मोठी अडचण गायींना मंदिरात प्रवेश देण्याची होती. कारण, येथे दररोज हजारो भक्तांची गर्दी असते. त्यामुळे गायी मंदिरात आल्यामुळे मंदिराची व्यवस्था बिघडली असती. त्यामुळे मंदिर मध्यरात्री उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. भगवान श्रीकृष्ण गायींचे भक्त होते. त्यामुळे ते रात्रीही त्यांना दर्शन देतील, असा विचार करण्यात आला. त्यानुसार मध्यरात्री 12 वा. मंदिराची कवाडे उघडण्यात आली.

गायींनी द्वारकेला पोहोचल्यानंतर सर्वप्रथम भगवान द्वारकाधीश यांचे दर्शन घेतले. त्यानंतर परिक्रमाही केली. यावेळी मंदिर परिसरात या गायींच्या स्वागतासाठी अनेकजण होते. मंदिराच्या पुजाऱ्यांनी देवाच्या प्रसादासह या गायींच्या चारापाण्याचीही व्यवस्था केली होती.

गायी बऱ्या झाल्या, दुसऱ्या गायींतही पसरला नाही व्हायरस

महादेव सांगतात की, 'भगवान द्वारकाधीश यांच्यावर सर्वकाही सोडून मी गायींच्या उपचारासाठी प्रयत्न केले. काही दिवसांतच गायी बऱ्या झाल्या. जवळपास 20 दिवसांनी सर्वच 25 गायी तंदुरुस्त झाल्या. एवढेच नाही गोशाळेतील दुसऱ्या गायींनाही लम्पी व्हायरसचा संसर्ग झाला नाही. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्यानंतर कच्छहून द्वारकेसाठी निघाल्या होत्या.'

बातम्या आणखी आहेत...