आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:सर्वोच्च न्यायालयात आता ई-फायलिंग 24 तास करता येणार

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या हस्ते शुक्रवारी ‘ई-फाइलिंग 2.0’ सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे इलेक्ट्रॉनिक रूपात प्रकरणे दाखल करण्याची २४ तास सुविधा मिळेल. ज्या वकिलांकडे या सुविधा नाहीत किंवा ज्यांना तंत्रज्ञान अवगत नाही, त्यांच्यासाठी दोन सुविधा केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत.

सरन्यायाधीशांनी वकिलांना सांगितले की, आता इलेक्ट्रॉनिक पद्धतीने केसेस दाखल करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असेल. सर्वोच्च न्यायालयाच्या आवारातील ई-सेवा केंद्राचे उद्घाटनही त्यांनी केले. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, 'आम्ही शुक्रवारी सकाळी ई-फायलिंग 2.0 सेवा सुरू केली आहे. सर्व वकिलांना या सुविधा २४ तास उपलब्ध असतील. सरन्यायाधीशांनी सांगितले की, ज्या वकिलांना या सुविधा नाहीत आणि तंत्रज्ञानाची माहिती नाही त्यांच्या मदतीसाठी दोन सुविधा केंद्रेही उघडण्यात आली आहेत. मुख्य न्यायमूर्तींनी न्यायालयीन कामकाजाच्या सुरुवातीला सांगितले की, त्यांनी सर्व वकिलांना 'ई-फायलिंग २.०' वापरण्याचे आवाहन केले. यावेळी कोर्टात उपस्थित भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि इतर वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे कौतुक केले.