आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक 2022:आधी 1 जीबी डेटा 300 रुपयांत, आता 10 रुपये ; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

अहमदाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या मिशनला धार देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सायंकाळी गुजरातेत दाखल झाले. त्यांनी वापीत रोड शो केला. त्यानंतर वलसाडमध्ये जाहीर सभा घेतली. त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मोदी म्हणाले, गुजरात व गुजरातच्या जनतेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेव्हा दक्ष राहा. अशा तत्वांना राज्यात स्थान देऊ नका. मागील काँग्रेस सरकारच्या काळात १ जीबी डेटाची किंमत ३०० रुपये हाेती. ती आता १० रुपये आहे. मासिक डेटासाठी २५०-३०० रुपये द्यावे लागतात. काँग्रेसची सत्ता असती तर ५ हजार रुपये मोजावे लागले असते. तत्पूर्वी, मोदींनी अरुणाचलच्या ईटानगरमध्ये नवीन डोनी पोलो विमानतळाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेशच्या वाराणसीत बीएचयू कॅम्पसमध्ये काशी-तमिळ संगमम् कार्यक्रमाचेही उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले.

पंतप्रधान ३० सभा, रोड-शो करतील १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यातील मतदानापर्यंत संपूर्ण राज्यात भाजप मोदींच्या ३० जाहीर सभा व रोड-शोची तयारी करत आहे. मोदी रविवारी अमरेली, धोराजी, बोटादमध्ये सभा घेतील.

बातम्या आणखी आहेत...