आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Earlier, People Were Happy When Electricity Reached The Village, Now They Are Happy With The Arrival Of 4 G

पंतप्रधान मोदींनी सांगितली 4-जीची महती:पूर्वी गावात वीज पोहोचल्यानंतर लोक खुश होत, आता 4-जी आल्याने आनंद

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवर ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 92 व्या भागाद्वारे देशाला संबोधित केले. मोदी म्हणाले, ‘देशातील गावागावांपर्यंत डिजिटल इंडियामुळे सुविधा पोहोचत आहेत. पूर्वी गावात वीज पोहोचल्यानंतर लोक खुश होत असत, आता नव्या भारतात तसा आनंद 4 जी आल्यानंतर होतो. इंटरनेटने आपल्या तरुण साथीदारांच्या अभ्यासाची आणि शिक्षणाची पद्धतच बदलली आहे. डिजिटल इंडिया देशाला जोडत आहे. पंतप्रधानांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि आगामी सणांचाही उल्लेख केला.

गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी भुजमध्ये केला रोड शो, भूकंपाच्या संकटाचे रूपांतर संधीत केल्याचा उल्लेख भुज | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी भुजमध्ये रोड शो केला. स्मृतिवनाचे उद्घाटनही केले. त्यानंतर मोदी म्हणाले की, भुजमध्ये २६ जानेवारी २००१ रोजी विनाशकारी भूकंप झाला तेव्हा मी दिल्लीत होतो. मी मुख्यमंत्री नव्हतो. तत्काळ येथे आलो, मदत-बचावकार्य केले. त्यानंतर अचानकच मला गुजरातचे मुख्यमंत्रिपद दिले. तेव्हा येथे केलेल्या कामाचा अनुभव माझ्या खूप उपयोगी पडला. मी बदल घडवून दाखवला.

‘स्वराज’ स्वत: पाहा, मुलांनाही दाखवा
मोदींनी देशवासीयांना आवाहन करताना म्हटले की, ‘काही दिवसांपूर्वीच दूरदर्शनवरील ‘स्वराज’ या मालिकेचे स्क्रीनिंग पाहण्याचा योग आला. स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणाऱ्या अनामिक नायक-नायिकांचा युवा पिढीला परिचय करून देणारा हा चांगला उपक्रम आहे. दूरदर्शनवर दर रविवारी रात्री 9 वाजता प्रसारण होते. वेळात वेळ काढून ते स्वत: पाहा आणि आपल्या कुटुंबातील मुलांनाही दाखवा.’

एकत्रित लढा देऊन कुपोषण संपवू
मोदी यांनी आसामच्या बोंगाई गावातील एका योजनेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, ‘संपूर्णा मोहीम’ या योजनेद्वारे कुपोषणाविरुद्ध लढा दिला जात आहे. यात अंगणवाडीत निरोगी मुलाची आई एखाद्या कुपोषित मुलाच्या आईची आठवड्यात एकदा भेट घेते. यामुळे एका वर्षात 90 टक्क्यांपेक्षा जास्त कुपोषण संपले आहे. त्याचबरोबर कुपोषणाप्रति जागरूकता वाढवण्यासाठी झारखंडच्या गिरिडीहमध्ये उपक्रम राबवले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...