आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Earlier, Terrorists Were Not Afraid, Now We Are Going Beyond The Border And Killing: Defense Minister Rajnath Singh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जयपूर:आधी अतिरेक्यांना भयच नव्हते, आता आम्ही सीमेपलीकडे जाऊन मारत आहोत : संरक्षणमंत्री राजनाथसिंह

जयपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन आघाड्यांवरील आव्हानांशी लढण्यास आम्ही पूर्णपणे तयार

आधी अतिरेक्यांना कसलीही भीती नव्हती. आता गरज भासल्यास आमचे जवान सीमेपलीकडे जाऊनही अतिरेक्यांच्या विरोधात कारवाई करतात, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केले. ‘दैनिक भास्कर’तर्फे गुरुवारी आयोजित सर्वात प्रदीर्घ ऑनलाइन डबल कीर्तिमान समारंभाच्या लाइव्ह सत्रात त्यांनी हे मत व्यक्त केले. ‘दैनिक भास्कर’चे संचालक गिरीश अग्रवाल आणि कार्यकारी संचालक डॉ. भरत अग्रवाल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. चीन-पाकिस्तानकडून एकाच वेळी मिळणाऱ्या आव्हानांच्या स्थितीत भारताच्या तयारीवर सिंह म्हणाले की, लष्कर दोन आघाड्यांवर युद्धासाठी पूर्णपणे तयार आहे. आमचे शूर जवान कुठल्याही स्थितीत देशाचे मस्तक झुकू देणार नाहीत. ७३ वर्षांत अनेक वेळा आव्हाने आली, पण लष्कराने त्यांचा यशस्वीपणे मुकाबला केला. सुरक्षा दलांतील उत्तम समन्वयाने अतिरेक्यांवरील कारवाईत यश मिळत आहे. काश्मिरातील दहशतवाद संपुष्टात येईलच. संरक्षणमंत्री म्हणाले, आमचे दुसरे आव्हान एलएसीचे आहे. भारत-चीनच्या दृष्टिकोनात फरक आहे. असे काही करार आहेत ज्यांचे पालन करत दोन्ही देश गस्त घालतात. चीन प्रोटोकॉलचे उल्लंघन करतो तेव्हा समस्या निर्माण होते.

चीनी लष्कराची एलएसीवरील एकतर्फी कारवाई भारत कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. आम्ही लष्कराला पूर्णंत: मोकळीक दिली आहे. कलम -३७० संपुष्टात आले तेव्हापासून पाकिस्तानचा थयथयाट सुरु आहे. आता ते पाक व्याप्त काश्मिर कब्जात घेण्याचा प्रयत्न करत आहे.पाक व्याप्त काश्मिर भारताचा अविभाज्य भाग आहे असा ठराव सर्वसहमतीने संसदेत मंजूर झाला आहे. हा ठराव आम्ही कधीही विसरु शकत नाही. व्याप्त काश्मिर भारतात विलीन होत नाही तोपर्यंत भारत-पाकिस्तान यांच्यातील सरहद्दीचा वाद संपुष्टात येणार नाही. पाकिस्तानसोबत आपली जी एलओसी आहे ती कायमस्वरुपी सरहद्द नाही. भलेही पाक मानत असेल पण भारत नाही. या मुद्यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा भारताचा प्रयत्न आहे. पाकिस्तानसोबत जेव्हा-केव्हा चर्चा होईल तेव्हा व्याप्त काश्मिरवर चर्चा होईल.

नेपाळ-भूतानमध्ये चीनचा वाढता प्रभाव ही चिंता
राजनाथ म्हणाले, नेपाळ आणि भूतानसोबत भारताचे संबंध खूप चांगले आहेत. दोन्हीही शांतताप्रिय देश आहेत.या देशांमधील चीनचा वाढता हस्तक्षेप भारतासमोरील चिंतेचा विषय आहे.ते कोणत्याही देशासोबत संबंध ठेवण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे परंतु संबंधांच्या नावाखाली त्या देशांच्या सरहद्दीची छेडछाड उचित नाही आणि भारतालाही ते मान्य नाही. बांगलादेशात शेख हसीना पंतप्रधानपद झाल्यानंतर भारतासोबतचे संबंध अधिक दृढ झाले आहेत. तिथे भारतविरोधी संघटनांवर कारवाई झाली आहे. सीमेवरही अधिक चांगला ताळमेळ आहे. म्यानमारसोबतचे संबंधही अधिक मजबूत झाले आहेत.

लष्करात दोन-तीन वर्षे सेवेचे धोरण लवकरच
काही देशांप्रमाणे भारतातही लष्करात काही वर्षांच्या अनिवार्य सेवेबाबत विचार केला जाऊ शकतो का, या प्रश्नावर संरक्षणमंत्री म्हणाले की,आम्ही याबाबत धोरण तयार करत आहोत. मंत्रिमंडळ स्तरावर निर्णय होणे बाकी आहे. या निर्णयामुळे युवकांत राष्ट्रीय अभिमानाची भावना वाढेल. काही महिन्यांतच धोरण तयार होईल. त्यात विद्यार्थी किंवा युवक दोन-तीन वर्षे सेवा दिल्यानंतर कुठलेही दुसरे कामही करू शकतो. एनसीसीची व्याप्तीही आम्ही वाढवत आहोत.