आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Earthquake In Gujarat | An Earthquake With A Magnitude Of 4.4 On The Richter Scale Hit 83 Km Northwest (NW) Of Rajkot

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरातमध्ये भूकंप:राजकोटमध्ये 4.4 तीव्रतेचा भूकंप, येथून 83 किमी दूर वायव्येस होते केंद्र; सुदैवाने कोणतीही हानी नाही

गांधीनगर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरातमध्ये रविवारी रात्री साडेआठ वाजता 5.5 तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले

गुजरातच्या राजकोटपासून 83 किलोमीटर दूर सोमवारी 12.57 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर त्याची तीव्रता 4.4 मोजली गेली.. राष्ट्रीय भूकंप केंद्राने ही माहिती दिली. येथे रविवारी रात्री 8.13 वाजत देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. याची तीव्रता 5.5 होती. भूकंपाचा केंद्रबिंदू कच्छच्या वोंध गावात होता. दिलासादायक बाब म्हणजे यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. 

रविवारी आलेल्या भूकंपाचा कच्छ येथे सर्वात वाईट परिणाम दिसून आला. 19 वर्षांपूर्वी 26 जानेवारी 2001 मध्ये कच्छच्या भुजमध्ये 7.7 तीव्रताचा भूकंप आला होता. यामध्ये 13 हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 

6 जून रोजी उत्तर गुजरातमध्ये आला होता भूकंप

याआधी 6 जून रोजी बनासकांठा जिल्ह्यासह उत्तर गुजरातच्या अनेक भागात 10 सेंकद भूकंपाचे धक्के जाणवले होते. याची तीव्रता 4.8 होती. 

गुजरातमध्ये 19 वर्षांपूर्वी भूकंपाने नुकसान झाले होते

गुजरातमध्ये 26 जानेवारी 2001 रोजी 7.7 तीव्रतेचा भूकंप आला होता. भुज आणि कच्छमध्ये मोठे प्रचंड नुकसान झाले होते. भूकंपामुळे 10 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. 26 जानेवारी रोजीच 2 हजार मृतदेह काढले होते. यामध्ये भुजच्या एका शाळेतील 400 विद्यार्थी होते. यादरम्यान रुग्णालयांचे देखील नुकसान झाले होते. यामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठी अडचण आली होती. 

का होतो भूकंप?

पृथ्वीच्या आत 7 प्लेट्स आहेत ज्या सतत फिरत असतात. जेथे या प्लेट्स अधिक टक्कर घालत असतात त्यांना झोन फॉल्ट लाइन म्हणतात. वेळोवेळी टक्कर झाल्याने प्लेट्सचे कोपरे मुडतात. अधित दबाव झाल्यानंतर या प्लेट्स तुटण्यास सुरुवात होते. खालील ऊर्जा बाहेर येण्याचा मार्ग शोधत असते. डिस्टर्बेंसनंतर भूकंप येतो. भूकंप ट्रॅक एजन्सीच्या मते हिमालय पट्ट्यातील फॉल्ट लाइनमुळे आशियाई प्रदेशात जास्त भूकंप येतात.

बातम्या आणखी आहेत...