आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Earthquake In Himachal Pradesh| Tremors Felt In Chamba's Churah, Magnitude 3.4 On Richter Scale | Marathi News

हिमाचलमध्ये भूकंप:चंबाच्या चुराहमध्ये जाणवले धक्के, रिश्टर स्केलवर 3.4 तीव्रता; लोक घराबाहेर पडले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशात शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र चंबा जिल्ह्यातील चुराह होते. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी होती. या भूकंपाचा परिणाम चंबा जिल्ह्यातील आसपासच्या भागातही दिसून आला. भूकंपाची खोली 5 किमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मध्यरात्री झालेल्या या भूकंपामुळे चंबातील अनेक भागातील लोक गाढ झोपेतून जागे झाले. तसेच अनेक ठिकाणी घराबाहेर पडले. विशेष म्हणजे हिमाचल प्रदेशसह हिमालयीन भागात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. बहुतांश घटनांमध्ये तीव्रता जास्त नोंदवली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

16 नोव्हेंबरलाही भूकंपाचे धक्के जाणवले
याआधीही 16 नोव्हेंबरला हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि मंडी जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाचे केंद्र मंडीचे जोगिंदर नगर होते, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 इतकी होती.

बातम्या आणखी आहेत...