आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Earthquake In Somnath, Gujarat, 4 And 3.2 Magnitude Tremors In Talala | Marathi News

भूकंप:गुजरातच्या सोमनाथमध्ये भूकंप, 4 आणि 3.2 रिश्टर स्केलच्या धक्क्यांनी घाबरून घराबाहेर पडले लोक

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील एका गावात सोमवारी सकाळी 4 आणि 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे सलग दोन धक्के जाणवले. वेरावळपासून 25 किमी अंतरावर असलेल्या तालाला गावात या भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक झोपेतून जागे झाले आणि घराबाहेर पडले. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाने जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

गांधीनगरच्या इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉजिकल रिसर्च (ISR) ने सांगितले की, 4.0 रिश्टर स्केलचा पहिला भूकंप सकाळी 6.58 वाजता आला. याचा केंद्रबिंदू तालाला गावापासून 13 किमी उत्तर-ईशान्येस होता. ISR ने एका निवेदनात म्हटले आहे की, 3.2 रिश्टर स्केलचा दुसरा भूकंप, ज्याचा केंद्रबिंदू तलालापासून नऊ किमी उत्तर-ईशान्य दिशेला होता, तो सकाळी 7.04 वाजता आला.

बातम्या आणखी आहेत...