आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराईशान्य भारतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशातील पश्चिम सियांग येथे होता. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, अरुणाचलमधील या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.7 एवढी होती.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अरुणाचल प्रदेशच्या ईशान्येकडील पश्चिम सियांग जिल्हा होता. सकाळी 10.31 वाजता त्याचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.7 इतकी मोजण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किमी खोलीवर होता.
दिल्ली-एनसीआरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
याआधी 9 नोव्हेंबरच्या रात्री दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले होते. मंगळवारी रात्री उशिरा 1:57 वाजता भूकंप झाला, त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी होती. दिल्ली-एनसीआर, यूपी आणि बिहारमध्ये हे धक्के जाणवले होते.
नेपाळ आणि मणिपूर होते केंद्र
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रात्री 1.57 वाजता झालेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ, मणिपूर होता. या भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती. विशेष म्हणजे दिल्ली एनसीआरसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवल्याने लोक घराबाहेर पडले.
उत्तराखंडमध्ये सकाळी पुन्हा धरणीकंप
यानंतर सुमारे साडेचार तासांनंतर बुधवारी सकाळी उत्तराखंडच्या पिथौरागढमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 तीव्रता मोजली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू 5 किमी खोलीवर होता.
नेपाळमधील डोटी जिल्ह्यात 6 ठार
दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा त्याचा परिणाम नेपाळमध्येही दिसून आला. नेपाळच्या डोटी जिल्ह्यात भूकंपानंतर पहाटे 2:12च्या सुमारास घर कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला. अनेक भागांत एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवले. यानंतर दुपारी 3.15 वाजता पुन्हा 3.6 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.