आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिहारमध्ये भूकंपाचे धक्के:पाटणामध्ये 3.5 तीव्रतेच्या भूकंपाचे सौम्य धक्के, घाबरुन घराबाहेर निघाले लोक; कोणतेही नुकसान झाल्याची माहिती नाही

पाटणा10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भूकंपामुळे अद्याप कोणतेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

बिहारची राजधानी पाटणामध्ये सोमवारी रात्री 9 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. जवळपास 30 सेकंदपर्यंत कंपन जाणवले. दहशतीमध्ये लोक घराबाहेर निघाले. सुदैवाने भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर 3.5 एवढी होती. भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 5 किलोमीटर होते.

पाटणाच्या बोरिंग रोड, आशियाना नगर, पटेल नगरच्या लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. तर भागलपूर, गया सह अनेक जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ट्विट करत म्हटले आहे की, त्यांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. तेजस्वी यादव यांनी ट्विट केले, 'पाटणामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत, मी प्रार्थना करतो की, सर्व लोक सुरक्षित राहतील आणि आपली काळजी घेतली. सुरक्षेची काळजी घ्या आणि जर गरज पडली तर सुरक्षित स्थानावर जा.'

12 फेब्रुवारीलाही रात्री साडे दहा वाजता उत्तर भारताच्या अनेक राज्यांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. रात्री 10.31 वाजता आलेल्या भूकंपामुळे दिल्ली एनसीआर, पंजाब, उत्तराखंड, जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये हादरले होते. भूकंपाचे केंद्र ताजिकिस्तान शहर होते. रिक्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.3 होती.