आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्रिपुरा-नागालँडमध्ये पुन्हा भाजप:काँग्रेस अन् डाव्यांची आघाडी पुन्हा अपयशी, भाजप सरकार स्थापन करणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकांचे निकाल गुरुवारी लागले. त्रिपुरा-नागालँडमध्ये पुन्हा भाजप आघाडीने बहुमत मिळवले आहे. तर, मेघालयमध्ये एनपीपीशी काडीमोडी घेत भाजपने सर्व ६० जागा लढवल्या तरीही भाजप पुन्हा त्याच आघाडीसोबत सरकार स्थापन करणार आहे. नागालँडच्या इतिहासात प्रथमच दोन महिला आमदार झाल्या आहेत.

आदिवासीबहुल आणि ख्रिश्चन अल्पसंख्याक लोकसंख्येच्या पूर्वोत्तर राज्यांमधील भाजपचा विजय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ईशान्येकडील ८ राज्यांमध्ये सिक्कीम वगळता ७ राज्यांत भाजपचे आघाडी सरकार आहे. काँग्रेसला या निकालात घोर निराशा पदरी पडली. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रथमच नागालँडमध्ये ७ जागा जिंकल्या आहेत.

काँग्रेस अन् डाव्यांची आघाडी पुन्हा अपयशी
सुजित ठाकूर | नवी दिल्ली
ईशान्येकडील तिन्ही राज्यांच्या निवडणूक निकालांचा थेट अन् मोठा संदेश म्हणजे, काँग्रेस व डावे पक्ष आघाडी तर करू शकतात, पण त्यांची मते एकमेकांमध्ये हस्तांतरित होत नाहीत. त्रिपुरातील निकालातून हे स्पष्ट झाले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात डाव्या पक्षांनी स्वबळावर १६ जागा जिंकल्या होत्या आणि त्यांच्या मतांची टक्केवारी ३६ जागा जिंकणाऱ्या भाजपपेक्षा १% पेक्षाही कमी होती.

हिंदूबहुल त्रिपुरामध्ये यंदा भाजपच्या ४ जागा मागील निवडणुकीच्या तुलनेत कमी आहेत, पण प्रथमच स्वबळावर निवडणूक लढवणारा टिपरा मोठा पक्ष १३ जागा जिंकण्यात यशस्वी ठरला. भाजपच्या जाणकारांच्या मते, ‘टिपरा मोथा आणि भाजपने आघाडी करून निवडणूक लढवली असती तर डावे-काँग्रेसच्या आघाडीचा सूपडा साफ झाला असता. एकूणच त्रिपुरामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून भाजपने विधानसभा निवडणूक लागोपाठ दोनदा जिंकत आपले स्थान भक्कम केले आहे.

ईशान्येतील इतर दोन राज्ये मेघालय व नागालँडमध्ये पक्ष मोठा चमत्कार करू शकला नाही, ही भाजपसाठी चिंतेची बाब आहे. नागालँडमध्ये भाजपने निवडणुकीपूर्वी आकलन केले आणि एनडीपीपीचा ज्युनिअर पार्टनर म्हणून २० जागांवर निवडणूक लढवली. तथापि, भाजप आघाडीचा येथे विजय झाला, पण पक्ष आपल्या जागा १२ च्या वर नेण्यात अपयशी ठरला. मेघालयातही भाजपने केवळ दोन जागा जिंकल्या. म्हणजेच ईशान्येतील या दोन्ही राज्यांत भाजपला आपले राजकीय महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी स्थानिक पक्षांचा आधार घ्यावा लागेल.

काँग्रेसला मेघालयात मोठा फटका बसला. येथे तृणमूलचे ५ उमेदवार जिंकले. यापैकी बहुतांश उमेदवारांनी काँग्रेस सोडून टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. या वर्षी होणाऱ्या इतर राज्यातील विधानसभा निवडणुका आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका पाहता तिन्ही राज्यांच्या निकालांवरून हे स्पष्ट होते की, स्थानिक वा प्रादेशिक पक्षांचा सामना करणे भाजपसाठी मोठे आव्हान आहे. तथापि, प्रादेशिक पक्षांसोबतची आघाडी काँग्रेससाठी फायद्याची ठरल्याचे संकेत पोटनिवडणुकीतून मिळाले आहेत. खासकरून तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीचे निकाल याची साक्ष देतात. तथापि, पश्चिम बंगालचा निवडणूक निकाल चकित करणारा आहे.

सहा जागांसाठी पोटनिवडणुका ... : प. बंगालमध्ये काँग्रेसचा ५१ वर्षांनंतर विजय
पश्चिम बंगाल : सागरदिघी : विधानसभेत काँग्रेसचा ५१ वर्षांनंतर विजय. १९७२ नंतर ७ वेळा डावे, २०११ नंतर तृणमूल जिंकली होती.
तामिळनाडू : इरोड पूर्व जागा काँग्रेसने राखली. काँग्रेस आमदाराच्या निधनाने रिक्त होती.
झारखंड : रामगड मधून एनडीएच्या अजासू विजयी. सोरेन यांना झटका. काँग्रेस आमदार अपात्र ठरल्याने जागा रिक्त झाली.
अरुणाचल : तवांग जिल्ह्यातील लुमला जागेवर भाजपच्या त्सेरिंग ल्हामू बिनविरोध. पतीच्या निधनाने रिक्त होती जागा.

बातम्या आणखी आहेत...