आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • ECI Has Not Issued Any Such Direction To CBDT To Issue Notice To Sharad Pawar: Election Commission

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण:शरद पवारांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यासंदर्भात कोणतेही निर्देश दिलेले नाही, निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार यांनी कालच्या मुंबईतील पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती खुद्द पवारांनीच दिली होती. यामध्ये त्यांना निवडणुकीच्या प्रतिज्ञपत्रात नमूद केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण मागवण्यात आले असल्याचे ते म्हणाले होते. आता यावर निवडणूक आयोगाकडून अधिकृत वक्तव्य जाहीर करण्यात आले आहे. बुधवारी निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणात आपण या संबंधी कोणतेही निर्देश दिलेले नाही असे स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाने सांगितले की, 'निवडणूक आयोगाने निर्देश दिल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना आयकर विभागकडून नोटीस पाठवण्यात आल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दाखवण्यात आले. मात्र ही माहिती चुकीची आहे. भारतीय निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष आयकर विभागाला नोटीस जारी करण्यासंबंधी कोणतेही निर्देश दिलेले नाहीत' असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने आता दिले आहे.

शरद पवार यांनी कालच्या मुंबईतील पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली होती. पवार म्हणाले होते की, 'सुरुवातीला मला नोटीस आली, आता सुप्रियाला येणार असल्याचे कळाले आहे, चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशातील एवढ्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम असल्याचा मला आनंद आहे. असा टोलाही पवारांनी लगावला होता. ते पुढे म्हणाले की, 'मला काल नोटीस आली आहे. या नोटीशीत काही बाबतीत स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.'

बातम्या आणखी आहेत...