आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Rana Kapoor, Kapil And Dheeraj Wadhawan's Assets Worth Rs 2,200 Crore Seized From ED

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

येस बँक मनी लॉन्ड्रिंग:ईडीकडून राणा कपूर आणि कपिल व धीरज वधावनची 2,200 कोटींची संपत्ती जप्त

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
राणा कपूर - Divya Marathi
राणा कपूर

येस बँक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचनालया (ईडी) ने गुरुवारी 2,200 कोटींपेक्षा जास्तीची संपत्ती जप्त केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, यात येस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि डीएचएफएलचे दिवाळखोर प्रमोटर्स कपिल व धीरज वधावनच्या संपत्तीचा समावेश आहे.

राणा कपूरच्या ज्या संपत्तीवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे, त्यात मुंबईच्या पेडर रोडवरील एक बंगला, मुंबईतील पॉश मालाबार हिल्समधील 6 फ्लॅट्स, दिल्लीतील पॉश अमृता शेरगिल मार्गावरील 48 कोटींची संपत्ती, न्यूयॉर्कमधील एक प्रॉपर्टी, लंडनमधील दोन प्रॉपर्टी, ऑस्ट्रेलियामधील एक कमर्शियल प्रॉपर्टी आणि 5 लग्जरी कार्सलाही जप्त केले आहे.

याप्रकरणी ईडीची परदेशातील मोठी करवाई

लंडनची प्रॉपर्टी जप्त करणे, परदेशातील येस बँक प्रकरणातील ईडीची सर्वात मोठी कारवाई आहे. याआधी सांगण्यात आले आहे की, येत्या काळात ईडी लंडनमधील एक प्रॉपर्टी आणि अंदाजे 50 कोटींच्या एफडी जप्त करणार आहे. ईडीने 6 मे 2020 दाखल आरोप पत्रात सांगितले होते की, कपूरने कर्ज देऊन फायदा मिळवण्यासाठी बँकेचा उपयोग केला.

कपूरला 11 जुलैला मिळाला होता जामीन

मागच्या आठवड्यात सीबीआयकडून दाखल प्रकरणी मुंबईतील एका विशेष न्यायालयाने कपूरला 11 जुलैपर्यंत अंतरिम जीमीन मंजूर केला होता. सीबीआयने मार्चमध्ये प्रकरण दाखल करुन घेतले होते. सीबीआयने आरोप लावला आहे की, अवांता ग्रुपच्या कंपन्यांना 1,900 कोटींचे कर्ज देण्यासाठी कपूरला कथितरित्या दिल्लीच्या लुटियन झोनचा एक बंगला खरेदी करण्यासाठी अवांता ग्रुपकडून 307 कोटींची लाच मिळाली होती.

कपिल व धीरज वधावन सीबीआयच्या ताब्यात

कपिल व धीरज वधावन सीबीआयच्या ताब्यात आहेत. त्यांना येस बँकसंबंधित प्रकरणात ताब्यात घेतले आहे. तिकडे, ईडी एका प्रकरणाची वेगळ्या पद्धतीने चौकशी करत आहे, ज्यात डीएचएफएलसंबंधित एका कंपनीने राणा कपूर आणि आणि त्यांच्या जवळच्यांच्या एका कंपनीला 600 कोटी रुपये दिले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser