आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • ED Attaches Rs 12 Cr Assets Of Farooq Abdullah, Others In JKCA Money Laundering Case

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फारुख अब्दुल्लावर कारवाई:अब्दुल्ला यांची 12 कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त, जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात कारवाई

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फारूख अब्दुल्ला यांच्या जप्त केलेल्या संपत्तीचे बाजार मूल्य 60-70 कोटी रुपये आहे

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली. ईडीने अब्दुल्ला यांची 11.86 कोटींची संपत्ती शनिवारी जप्त केली. जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे.

जप्त संपत्तीचे बाजार मूल्य 60-70 कोटी रुपये

जप्त करण्यात आलेल्या संपत्तीमध्ये अब्दुल्ला यांची 3 घरे, 2 प्लॉट आणि एका कमर्शियल प्रॉपर्टीचा समावेश आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी याबद्दलची माहिती दिली आहे. या संपत्तीचे पुस्तक मूल्य 11.86 कोटी दाखवण्यात आले आहे. मात्र तिचे बाजार मूल्य 60-70 कोटी रुपये आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अब्दुल्ला यांची अनेकवेळा चौकशी केली आहे. ऑक्टोबरमध्ये श्रीनगर येथे त्यांची शेवटची चौकशी झाली होती.

पदाचा गैरवापर केल्याचा अब्दुल्ला यांच्यावर आरोप

2005 ते 2011 दरम्यान JKCAला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)कडून 109.78 कोटी रुपये मिळाले होते. अब्दुल्ला 2006 ते 2012 पर्यंत JKCA चे अध्यक्ष होते. त्यांच्यावर पदाचा गैरवापर करणे, बेकायदेशीर नियुक्त्या करणे आणि मनी लॉन्ड्रिंगच्या उद्देशाने JKCA च्या पदाधिकाऱ्यांना आर्थिक अधिकार देण्याचा आरोप आहे.

जप्त केलेली मालमत्ता वडिलोपार्जित आहे - उमर अब्दुल्ला

फारुख अब्दुल्ला यांचे सुपुत्र उपर अब्दुल्ला म्हणाले की, जप्त केलेली संपत्ती वडिलोपार्जित आहे. यातील अनेक 1970 च्या काळातील आहेत. फारुख अब्दुल्ला आपल्या वकिलांच्या संपर्कात आहेत, ते या बिनबुडाच्या आरोपींविरोधात न्यायालयात लढा देतील. जेथे प्रत्येकालाच न्यायाची अपेक्षा असते. तर मीडिया कोर्ट किंवा भाजपा पुरस्कृत सोशल मीडिया कोर्टाचा मुद्दा वेगळा आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser