आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • National Herald Case ED Finds Hawala Link । Sonia Gandhi Rahul Gandhi | National Herald Case Hawala Link Updates

नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDला मिळाली हवाला लिंक:हवाला ट्रान्झॅक्शनचे पुरावे मिळाले, सोनिया-राहुल यांच्या जबाबांची पुन्हा चौकशी होणार

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) हवाला लिंक मिळाली आहे. त्यामुळे ईडी पुन्हा कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी करणार आहे. यापूर्वी दोघांनी केलेल्या वक्तव्याची फेरतपासणी केली जाणार आहे. ईडी सूत्रांकडून दावा करण्यात आला की, नॅशनल हेराल्ड प्रकरणाशी संलग्न कंपन्या आणि थर्ड पार्टीत झालेल्या हवाला व्यवहाराचे पुरावे सापडले आहेत.

कशी मिळाली ईडीला हवाला लिंक?

दिल्लीतील हेराल्ड बिल्डिंगमधील यंग इंडियाच्या कार्यालयाच्या तपासणीदरम्यान ईडीला काही कागदपत्रे सापडली आहेत. मुंबई आणि कोलकाता येथील हवाला ऑपरेटर्सच्या व्यवहाराचे पुरावे कागदपत्रांमध्ये मिळाले आहेत. त्यामुळे कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, नेते राहुल गांधी हे अडचणीत आले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, यंग इंडियाच्या कार्यालयाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर तपास यंत्रणा मोठी कारवाई करेल, मात्र ही कारवाई काय असेल, हे अद्याप सूत्रांकडून सांगण्यात आलेले नाही.

राहुल, सोनिया गांधी यांची पुन्हा चौकशी!

नॅशनल हेराल्डप्रकरणी यापूर्वी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची चौकशी झाली आहे. यंग इंडियाकडून रोखीसंबंधी इतर कोणताही लाभ घेतला नसल्याचे सोनिया गांधी यांनी चौकशीत सांगितले होते. दरम्यान, यंग इंडियाकडून मिळालेल्या कागदपत्रांनंतर ईडी विभागाचे अधिकारी राहुल, सोनिया गांधी यांच्या उत्तरावर समाधानी नाहीत. त्यामुळे त्यांच्या जबाबांची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते. ​​​​​​

नॅशनल हेराल्ड बिल्डिंगमधील यंग इंडियाचे कार्यालय सील केल्यानंतर ईडीने ही नोटीस चिकटवली आहे.
नॅशनल हेराल्ड बिल्डिंगमधील यंग इंडियाचे कार्यालय सील केल्यानंतर ईडीने ही नोटीस चिकटवली आहे.

मंगळवारी 16 ठिकाणी छापे, बुधवारी कार्यालय सील

ईडीच्या पथकाने मंगळवारी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यासह नॅशनल हेराल्डच्या 16 ठिकाणी छापे टाकले होते. सोनिया आणि राहुल यांची चौकशी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. बुधवारी ईडीने दिल्लीतील हेराल्ड बिल्डिंगमधील यंग इंडिया कंपनीचे कार्यालय सील केले. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपला कर्नाटक दौरा सोडून दिल्लीला परतले.

सोनिया गांधी यांना 100 हून अधिक प्रश्न विचारले गेले

नॅशनल हेराल्डप्रकरणी सोनिया गांधी यांची 3 दिवसांत 12 तास चौकशी करण्यात आली. ईडीने 21 जुलैला 3 तास, 26 जुलैला 6 तास आणि 27 ऑगस्टला 3 तास चौकशी करण्यात आली. यावेळी त्यांना 100 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले. ईडीने जूनमध्ये पाच दिवसांत राहुल गांधींची 50 ता्सांपेक्षा जास्त चौकशी केली होती.

बातम्या आणखी आहेत...