आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरण:ईडीने सोनिया गांधींची दुसऱ्या दिवशी सहा तास केली चौकशी, आज पुन्हा बोलावले

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) नॅशनल हेरॉल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची मंगळवारी दुसऱ्या दिवशीही चौकशी केली. त्यांच्याशी सहा तासांहून जास्त वेळ प्रश्नोत्तरे झाली. त्यांना बुधवारी पुन्हा चौकशीसाठी बाेलावले आहे. दुसरीकडे, काँग्रेसने केंद्र सरकारवर तपास यंत्रणांच्या दुरुपयोगाचा आरोप करत दिल्लीसह देशभरात निदर्शने केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधींसह अनेक खासदारांना विजय चौकात ताब्यात घेतले. सोनिया गांधी सकाळी ११ वाजता ईडी मुख्यालयात पोहोचल्या. दुपारी ३.३० वाजता पुन्हा ईडीच्या कार्यालयात गेल्या. त्यांच्यासोबत प्रियंका गांधी वढेरा आणि राहुल गांधी होते. राहुल काँग्रेस नेत्यांसोबतच्या आंदोलनात सहभागी झाले. प्रियंका ईडी कार्यालयातील दुसऱ्या खोलीत बसल्या होत्या.

देशाला पोलिस स्टेट केले
पोलिसांनी स्थानबद्ध केल्यानंतर राहुल म्हणाले की, सरकार महागाईच्या मुद्‌द्यावर संसदेत चर्चा होऊ देत नाही. निदर्शने केल्यावर अटक केली जात आहे. देशाला पोलिस स्टेट केले आहे. राहुल राष्ट्रपती भवनाकडे जात होते.

बातम्या आणखी आहेत...