आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉंग्रेस नेत्यांनी मोतीलाल व्होरांचे नाव घेतले:हेराल्ड प्रकरणी चौकशीत नेते म्हणाले, आर्थिक निर्णय व्होरा घेत असत, मात्र, पुरावा मिळाला नाही

नवी दिल्ली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी आर्थिक व्यवहारांच्या माहितीपासून हातवर केले आहे. ईडीच्या सुत्रांनी सांगीतले की, सोनिया गांधी, राहूल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि पवन बन्सल या कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी व्यवहाराशी संबंधित सर्व निर्णय मोतीलाल व्होरा हे घेत असल्याचे सांगितले. मात्र, याचा पुरावा ते ईडीकडे सादर करू शकले नाही.

ईडीला अनेक बनावट कंपन्या सापडल्या

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे हे यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​एकमेव कर्मचारी आहेत. अशा स्थितीत ईडीकडे खरगे यांना चौकशीसाठी बोलावण्याशिवाय पर्याय नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीला अनेक बनावट कंपन्या सापडल्या आहेत. ज्यांच्याशी यंग इंडीयाशी व्यवहार झालेला आहे. कंपनीच्या 90 कोटींच्या व्यवहारावर ईडीचा संशय आहे.

खरगे यांची ईडीकडून 8 तास चौकशी

नॅशनल हेराल्ड प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांची 8 तास चौकशी केली. तपास यंत्रणेने यंग इंडियाच्या कार्यालयातच त्यांची चौकशी केली. दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास चौकशी सुरू झाली. यावेळी कार्यालयाचीही झडती घेण्यात आली. रात्री साडेआठच्या सुमारास खरगे तब्बल आठ तासानंतर कार्यालयातून बाहेर आले. ईडीच्या समन्सवर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खरगे यांनी गुरूवारीच प्रश्न उपस्थित केला होता. संसदेच्या कामकाजा दरम्यान बोलावणे योग्य आहे का. असा सवाल त्यांनी केला होता. यावर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर दिले की, कोणी चुकीचे केले तर एजन्सी कारवाई करतील. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला.

यंग इंडियाचे कार्यालय सील

बुधवारीही यंग इंडियाच्या कार्यालयाची झडती घेण्यात आली. छापेमारीनंतर ईडीने नॅशनल हेराल्ड इमारतीतील यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ​​कार्यालय सील केले होते. यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल करत देशातील लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप केला.

कोण आहेत मोतीलाल व्होरा

मोतीलाल व्होरा हे काँग्रेसचे दिग्गज नेत्यांपेकी एक होते. दोन वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्रीपदी काम केले. 2000 ते 2018 (18 वर्षे) ते कॉंग्रेस पक्षाचे कोषाध्यक्षही होते. तर 21 डिसेंबर 2021 रोजी त्यांचे निधन झाले. 1970 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1972 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले. यानंतर 1977 आणि 1980 मध्येही आमदार निवडून आले. अर्जुनसिंह यांच्या मंत्रिमंडळात ते उच्च शिक्षण खात्याचे राज्यमंत्री होते. 1983 मध्ये त्यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. 1981-84 दरम्यान ते मध्यप्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्षही होते.

व्होरा (AJL) चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक होते

13 फेब्रुवारी 1985 रोजी व्होरा यांना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनवण्यात आले. 13 फेब्रुवारी 1988 रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन 14 फेब्रुवारी 1988 रोजी केंद्राच्या आरोग्य-कुटुंब कल्याण आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारला. एप्रिल 1988 मध्ये व्होरा मध्यप्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले. 26 मे 1993 ते 3 मे 1996 पर्यंत ते उत्तरप्रदेशचे राज्यपाल होते.

जाणून घ्या काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?

नॅशनल हेराल्ड प्रकरणाची बाब भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये पहिल्यांदा मांडली होती. ऑगस्ट 2014 मध्ये, ईडीने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आणि मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडीज, सॅम पित्रोडा आणि सुमन दुबे यांना आरोपी करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...