आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने पार्थवर फेकली चप्पल:म्हणाली- डोक्याला लागली असती तर बरे झाले असते, जनतेचा पैसा लुटणाऱ्याला AC गाडीतून नेले जात आहे

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पार्थ चॅटर्जी यांच्यावर मंगळवारी एका महिलेने चप्पल फेकली. पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना दर 48 तासांनी वैद्यकीय चाचणीसाठी ESIC रुग्णालयात आणले जाते. आज ते वैद्यकीय चाचणीसाठी आले असता, परतत असताना ही घटना घडली.

चप्पल फेकल्यानंतर महिला म्हणाली– गरीब कष्ट करून पैसे कमवतात आणि पार्थसारख्या लोकांना महागड्या गाड्यांमध्ये नेले जाते. मी अनवाणी फिरेन, त्याने जनतेचा पैसा लुटला, तरीही त्याला एसी गाडीतून रुग्णालयात आणले जात आहे. माझी चप्पल त्याच्या डोक्याच्या टक्कल भागात लागली असती तर मला आवडले असते, असे महिलेने यावेळी सांगितले.

अर्पिताच्या फ्लॅटवर EDची छापेमारी:अपार्टमेंटचे CCTV फुटेज खंगाळले, एंट्री रजिस्टर जप्त; 11 बँक खाते सील करण्याची तयारी

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी रात्री अर्पिता मुखर्जी यांच्या बेलघरिया स्थित फ्लॅटवर धाड टाकली. सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीने येथील अपार्टमेंटचे सीसीटीव्ही फुटेज खंगाळून एंट्री डायरीही तपासली. चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी एंट्री डायरी व मायगेट अॅपचा डेटा जप्त केला.

अपार्टमेंटचे सचिव अमिति चौरसिया यांनी माध्यमांना सांगितले की, आम्ही ईडीच्या अधिकाऱ्यांना व्हिजिटर बूक व मायगेट अॅपचा डेटा दिला. तांत्रिक कारणांमुळे सीसीटीव्ही फुटेाज काढता आले नाही. पण ते सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत.

याच फ्लॅटमध्ये आढळले होते 28 कोटी

27 जुलै रोजी ईडीने अर्पिताच्या बेलघरियाच्या याच फ्लॅटवर छापेमारी केली होती. त्यात जवळपास 28 कोटींची रोकड जप्त केली होती. 18 तासा चाललेल्या या छापेमारीत ईडीच्या टीमने 5 किलो सोनेही जप्त केले होते. फ्लॅटमध्ये ऐवढे पैसे आढळल्यानंतर अर्पिताने प्रथमच ही संपूर्ण रकम पार्थ चॅटर्जी यांची असल्याचे कबूल केले होते.

ईडीने अर्पिताच्या निवासस्थानी 23 व 27 जुलै रोजी छापेमारी केली होती. पहिल्या दिवशी 26 तास व दुसऱ्या दिवशी सलग 18 तास ही कारवाई चालली.
ईडीने अर्पिताच्या निवासस्थानी 23 व 27 जुलै रोजी छापेमारी केली होती. पहिल्या दिवशी 26 तास व दुसऱ्या दिवशी सलग 18 तास ही कारवाई चालली.

ED चौकशीत चॅटर्जी-अर्पिता आतापर्यंत काय-काय म्हणाले?

1. पार्थ चॅटर्जी: अर्पिताच्या फ्लॅटमध्ये आढळलेले पैसे कुणाचे आहेत, हे मला ठावूक नाही. शिक्षण विभागातील नेत्यांच्या शिफारशीनुसार नोकऱ्या देण्यात आल्या.

2. अर्पिता मुखर्जी: माझ्या फ्लॅटमध्ये आढळलेले संपूर्ण पैसे पार्थ चॅटर्जींचे आहेत. मला फ्लॅटवर जाण्याची परवानगी नव्हती. चॅटर्जींचे लोक फ्लॅटवर कॅश ठेवण्यासाठी येत होते.

11 बँकांत दोघांचे जॉइंट अकाउंट, 8 कोटी ठेवले

ED सूत्रांच्या माहितीनुसार, चॅटर्जी व अर्पिताचे तब्बल 11 बँकांत जॉइंट खाते आहेत. त्यात 8 कोटी रुपये असल्याचे पुरावे मिळालेत. एजंसी लवकरच ही खाती गोठवणार आहे. एवढेच नाही तर पार्थ यांच्या जवळपास 15 आणखी ठिकाणांवरही लवकरच छापेमारी केली जाणार आहे.

पेंटहाऊसची माहिती मिळाली, 2 फ्लॅटही

ED सूत्रांनी सांगितले की, अर्पिताच्या ज्या फ्लॅटमध्ये 22 कोटींची रोकड आढळली होती, त्या सोसायटीत पार्थ यांनी वेगवेगळ्या नावांनी एक पेंटहाऊस व 2 फ्लॅट्स खरेदी केले होते. छापेमारीनंतर सोसायटीच्या ज्या अॅपमधून या फ्लॅट्सची माहिती काढून टाकण्यात आली.

शूटिंगसाठी भाड्याच्या टॅक्सीने जात होती, 10 वर्षांपूर्वी चॅटर्जींच्या संपर्कात

आनंद बाजार पत्रिकेने सोसायटीत राहणाऱ्या लोकांचा दाखला देत सांगितले की, अपार्टमेंटच्या 19 व्या व 20 व्या मजल्यावर 2 फ्लॅट्स आहेत. तर सर्वात वर पेंटहाऊस बांधण्यात आले आहे. येथील रहिवाशांनी पार्थ कधीतरी या पेंटहाऊसमध्ये येत असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...