आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापेमारी:नॅशनल हेराल्ड मुख्यालयासह ईडीची 12 िठकाणी छापेमारी

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेराल्डच्या मुख्यालयासह १२ ठिकाणी ईडीने मंगळवारी छापे मारले.आ‍र्थिक गैरव्यवहारप्रकरणी पीएमएल कायद्यानुसार ईडीने ही छापेमारी केली आ‍हे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या चाैकशीनंतर आ‍ठवडाभराने ईडीने ही कारवाई केली आ‍हे.

काही दिवसांपूर्वी चौकशीत काही नवे पुरावे ईडीला मिळाले असून त्या दृष्टीने पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने हे धाडसत्र राबवण्यात आ‍ले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात सोनिया गांधी यांची तीन टप्प्यात ११ तास ईडीने चौकशी केली आहे. तर राहुल गांधी यांची ५ दिवस तब्बल ५० तास चौकशी करण्यात आली होती. दरम्यान, ही छापेमारी म्हणजे सूडाचे राजकारण असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आम्ही सातत्याने सरकारला धारेवर धरणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...