आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • ED Raids Congress Leader Ahmed Patel's House Close, Ed Team Recorded Congress Leader Ahmed Patel Statement

अंमलबजावणी संचलनालयाचा छापा:संदेसरा ब्रदर्सच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अहमद पटेलांची दिल्लीत चौकशी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) छापेमारी केली आहे. ईडीकडून बायोटेक संधेसारा घोटाळा प्रकरणी अहमद पटेल यांची चौकशी करण्यात येत आहे. स्टर्लिंग बायोटेक घोटाळा प्रकरणी अहमद पटेल यांच्यावर 15 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. दरम्यान, यापूर्वी ईडीकडून अहमद पटेल यांना या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. 

पटेल यांचा जबाब देखील नोंद केली जात असल्याची माहिती आहे. यासोबतच ईडीने यापूर्वी अनेकवेळा पटेल यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र कोरोनाचे कारण देऊन टाळाटाळ केली जात होती. यापूर्वी अहमद पटेल यांचा मुलगा फैसल आणि जावई ऍड. सिद्दीकी यांची देखील याप्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता पटेल यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी करण्यात आली. पटेल यांचीही चौकशी सुरू आहे. त्यांचा जबाब नोंदवणे सुरू आहे. 

अहमद पटेल यांच्यावर स्टर्लिंग बायोटेक लिमिटेड (एसबीएल)/सांदेसरा ग्रुपच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सुमारे 5 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. याच प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीच्या छाप्यानंतर अहमद पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संदेसरा समुहावर बँकेच्या फसवणुकीचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल आहे. आता हाच धागा अहमद पटेल यांच्यापर्यंत पोहोचला आहे. 

Advertisement
0