आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ED ची कोलकात्यात छापेमारी, 12 कोटी जप्त:मोबाइल गेमिंग अ‍ॅपच्या प्रमोटर्सवर कारवाई; बक्षिसाचे आमिष दाखवून सामान्यांची केली लूट

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) शनिवारी कोलकाता स्थित मोबाइल गेमिंग अ‍ॅप कंपनीच्या प्रवर्तकांच्या 6 ठिकाणांवर छापेमारी केली. त्यात 12 कोटींची रोकड जप्त करण्यात आली. मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले. ईडीने एका फोटोद्वारे ही माहिती दिली.

फोटोमध्ये 2000, 500 व 200 रुपयांच्या नोटांचे बंडल दिसून येत आहेत. मोबाइल गेमिंग अ‍ॅप कंपनी 'ई-नगेट्स' व तिचा प्रवर्तक आमिर खान व इतरांच्या ठिकाणांवर ईडीची कारवाई सुरू आहे. ईडीच्या माहितीनुसार, या ठिकाणी नोटांची मोजणी अद्याप सुरू आहे.

कोलकात्यातील ईडीच्या छाप्यात आढळेली रकम मोजण्यासाठी मशिन मागवण्यात आली आहे.
कोलकात्यातील ईडीच्या छाप्यात आढळेली रकम मोजण्यासाठी मशिन मागवण्यात आली आहे.

फेब्रुवारी 2021 मध्ये नोंदवला होता FIR

ईडीने सांगितले की, फेडरल बँकेने प्रथम कोलकाता कोर्टात कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये कोलकाता पोलिसांनी कंपनी व तिच्या प्रवर्तकांवर एफआयआर नोंदवला. शनिवारी ईडीने छापा टाकून कारवाई केली.

कोलकात्यातील गार्डन रीच भागातील ईडीच्या कारवाईवेळी केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. या घरातून ईडीने 12 कोटी रुपयांची रोकड जप्त केली.
कोलकात्यातील गार्डन रीच भागातील ईडीच्या कारवाईवेळी केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. या घरातून ईडीने 12 कोटी रुपयांची रोकड जप्त केली.

कोलकाता स्थित पार्क स्ट्रीट, मॅक्लिओड स्ट्रीट, गार्डन रीच व मोमीनपूर येथे सकाळपासूनच ईडीच्या वेगवेगळ्या पथकांनी छापेमारी केली. केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने ही कारवाई केली जात आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी वकील पिता-पुत्राच्या निवासस्थानाचीही झडती घेतली आहे.

अॅप फसवणुकीसाठी लाँच केले - ED

ईडीने आरोप केला - आमिर खानने लोकांची फसवणूक करण्यासाठी ई-नगेट्स हे मोबाईल गेमिंग अॅप लॉन्च केले. प्रारंभी कंपनीने वापरकर्त्यांना कमिशन दिले. यामुळे लोकांचा कंपनीवरील विश्वास वाढला. त्यांनी जास्त कमिशनच्या लालसेपोटी मोठी रक्कम कंपनीत गुंतवली. त्यानंतर कंपनीने अचानक पैसे देणे बंद केले.

यंत्रणा अपग्रेडेशन व सरकारी यंत्रणांच्या चौकशीमुळे हे थांबवण्यात आल्याचा दावा कंपनीने केला. त्यानंतर प्रोफाइल माहितीसह सर्व डेटा अॅप सर्व्हरवरून काढून टाकण्यात आला. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे युझर्सच्या लक्षात आले. तपास यंत्रणा या प्रकरणी चिनी अॅप्सच्या फसवणुकीच्या अंगानेही तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...