आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ED Raids Various Places In Jharkhand In Connection With Illegal Excavations, Latest News And Update

अवैध उत्खननाप्रकरणी ED ची धाड:झारखंडच्या IAS पूजा सिंघल यांच्या CA च्या घरी आढळली 25 कोटींची रोकड, नोटा मोजण्यासाठी मागविल्या मशीन

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध उत्खननाप्रकरणी ईडीने शुक्रवारी सकाळी 5 च्या सुमारास देशभरात छापेमारी केली. ही कारवाई झारखंडच्या वरिष्ठ सनदी अधिकारी पूजा सिंघल व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या 20 ठिकाणांवर करण्यात आली. त्यात सिंघल यांच्या निकटवर्तीय सीएच्या घरी तब्बल 25 कोटींची रोकड आढळल्याचे वृत्त आहे. ही रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांनी मशीन मागविल्या आहेत. ईडीच्यावतीने ही रोकड मिळाल्याची अद्याप पुष्टी करण्यात आली नाही.

ED च्या अधिकाऱ्यांनी सनदी अधिकाऱ्याच्या सीएच्या घरी आढळलेली 25 कोटींची रोकड अशा पद्धतीने ठेवली होती.
ED च्या अधिकाऱ्यांनी सनदी अधिकाऱ्याच्या सीएच्या घरी आढळलेली 25 कोटींची रोकड अशा पद्धतीने ठेवली होती.

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने एकाचवेळी झारखंडच्या रांची, धनबाद, खूंटी, राजस्थानचे जयपूर, हरयाणाच्या फरिदाबाद व गुरुग्राम, पश्चिम बंगालच्या कोलकाता, बिहारच्या मुजफ्फरपूर व दिल्ली-एनसीआरत छापेमारी केली. दिव्य मराठीने पूजा सिंघलशी बाजू ऐकण्यासाठी त्यांना संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

पल्स इस्पितळातील छापेमारीवेळी उपस्थित सुरक्षा कर्मचारी.
पल्स इस्पितळातील छापेमारीवेळी उपस्थित सुरक्षा कर्मचारी.

रांचीतील कांके रोडच्या चांदनी चौक स्थित पंचवटी रेसीडेन्सीच्या ब्लॉक क्रमांक 9, लालपूरच्या हरिओम टॉवर स्थित नवी बिल्डिंग, बरियातूच्या पल्स रुग्णालयातही छापेमारी झाल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे पल्स इस्पितळ पूजा सिंघल यांचे पती व व्यावसायिक अभिषेक झा यांचे आहे. सनदी अधिकारी पूजा सिंघल यांच्या सरकारी निवासस्थानीही छापेमारी झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी ईडीच्या अधिकृत प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे.

आयएएस अधिकारी पूजा सिंघल आपले पती अभिषेक यांच्यासोबत.
आयएएस अधिकारी पूजा सिंघल आपले पती अभिषेक यांच्यासोबत.

आयएएस पूजा सिंघलचे पती अभिषेक यांच्या निवासस्थानीही छापेमारी सुरू आहे. आयएएस अधिकारी राहुल पुरवार यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर पूजा सिंघल यांनी अभिषेक यांच्याशी लग्न केले होते. अभिषेक यांच्या रातू रोडवरील एका प्रतिष्ठानावरही ईडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. या कारवाईत अनेक महत्वपूर्ण दस्तावेज जप्त करण्यात आलेत. धनबादमध्येही अनेक ठिकाणी धाडसत्र सुरू आहे.

सिंघलशी संबंधित सर्वच प्रकरणांचा तपास

ईडीने मनरेगा घोटाळ्यातील एका प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले होते. ईडीने या शपथपत्राद्वारे कोर्टापुढे झारखंडच्या खूंटी जिल्ह्यातील मनरेगातील 18.06 कोटींच्या घोटाळ्यावेळी पूजा सिंघल त्या ठिकाणी उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या असले स्पष्ट केले होते.

रांचीतील छापेमारीवेळी उपस्थित सुरक्षा जवान.
रांचीतील छापेमारीवेळी उपस्थित सुरक्षा जवान.

या प्रकरणी तेथील कनिष्ठ अभियंता राम विनोद प्रसाद सिन्हा यांना अटक करुन तुरुंगात पाठवण्यात आले होते. त्यांनी ईडीला दिलेल्या आपल्या निवेदनात कमीशनची रक्कम उपायुक्त कार्यालयापर्यंत जात असल्याचे स्पष्ट केले होते. सिंघल त्यावेळी चतरा जिल्ह्यात ऑगस्ट 2007 ते जून 2008 पर्यंत उपायुक्तपदी नियुक्त होत्या.

पूजा सिंघल यांचे सरकारी निवासस्थान
पूजा सिंघल यांचे सरकारी निवासस्थान

पूजा सिंघल यांनी 2 एनजीओंना मनरेगांतर्गत 6 कोटींची आगाऊ उचल दिल्याचा आरोप आहे. यात वेल्फेअर पॉइंट व प्रेरणा निकेतन या 2 स्वयंसेवी संस्थांचा समावेश आहे. ही रकम मूसळीच्या शेतीसाठी वाटप करण्यात आली होती. पण, प्रत्यक्षात तिथे कोणतेही कार्य झाले नव्हते. त्याची चौकशी अद्याप सुरू आहे.

याशिवाय, पलामू जिल्ह्याच्या उपायुक्तपदी असताना पूजा सिंघल यांच्यावर जवळपास 83 एकर वनभूमी एका खासगी कंपनीला उत्खनन करण्यासाठी हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. हे कठौतिया कोल माइंसशी संबंधित प्रकरण आहे. ईडीने कोर्टाला या प्रकरणाचाही तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...