आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासक्तवसुली संचालनालयाने(ईडी) क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंज प्लॅटफॉर्म वजीरएक्सविरोधात कठोर कारवाई केली. ईडीने वजीरएक्सवर मालकी हक्क बाळगणारे आणि ती संचालित करणारी कंपनी जनमाई लॅब्ज प्रा.लिमिटेडच्या एका संचालकाच्या ठिकाणांवर छापे टाकून ६४.६७ कोटी रुपयांच्या बँक ठेवी गोठवल्या आहेत. ईडीच्या आरोपानुसार, वजीरएक्सच्या मदतीने चालणाऱ्या १६ फिनटेक कंपन्यांनी अवैध कमाईला व्हर्च्युअल क्रिप्टो अॅसेट्सची खरेदी आणि ट्रान्सफर करून वैध बनवले.
यासोबत रिझर्व्ह बँकेच्या नियमांना हरताळ फासला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वजीरएक्सच्या संचालकाच्या असहकाराच्या भूमिकेमुळे ३ ऑगस्टला पीएमएलएअंतर्गत संचालक समीर म्हात्रे क्रिप्टो अॅसेट्सशी संबंधित देवाण-घेवाणीची माहिती देत नव्हते. मालमत्ता इन्स्टंट लोन अॅप फसवणुकीच्या काळ्या कमाईतून खरेदी केल्याचे समोर आले होते. संस्थेने वजीरएक्सवर गेल्या वर्षी ‘फेमा’च्या कथित उल्लंघनाचा आरोप केला होता.६५.६७ कोटी रुपयांच्या बँक ठेवी गोठवल्या
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.