आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  •  ED Search Operations And Other Details Shared In Lok Sabha Only 23 Persons Were Convicted | Marathin News 

ईडी कारवायांची आकडेवारी:नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात ईडीचे 2974 छापे; काँग्रेसच्या काळात 112, आकडेवारी लोकसभेत सादर

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसभेत आज ईडीच्या छाप्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली. मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक 2 हजार 974 छापे टाकण्यात आले. तर 2004 ते 2014 या दहा वर्षांत काँग्रेसच्या काळात एकूण ईडीचे 112 छापे टाकण्यात आले होते. तर 2005 मध्ये PMLA कायदा म्हणजेच प्रीव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग आल्यापासून 943 केसेस दाखल करण्यात आले. 2005 पासून ईडी कारवाया करत असली तरी आतापर्यंत केवळ 23 व्यक्तींना शिक्षा झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय राजकीय नेत्यांकडून ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांची संख्या कमी असल्याचे बोलले जाते. ही आकडेवारी समोर आल्यानंतर राजकीय नेत्यांची प्रतिक्रिया काय येणार हे पाहावे लागणार आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात किती छापे
केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकार स्थापन झाल्यानंतर पीएमएलए कायदा अस्तित्त्वात आला. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वात 2004 ते 2014 या काळात ईडीने 112 छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. त्यांअतर्गत 5316.16 कोटींच्या गैरव्यवहारासंदर्भात 104 तक्रारी दाखल झाल्या होत्या, असे लोकसभेत मांडण्यात आले.

मोदींच्या काळात किती छापे
2014 साली भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेत आले. 2014 पासून 2022 या मोदी सरकारच्या कार्यकाळात ईडीच्या कारवाया वाढल्याचे पाहायला मिळत आहे. ईडीने मोदींच्या कार्यकाळात 2974 छापे टाकले आहेत. तर, 839 तक्रारीअंतर्गत 95 हजार 432 कोटी रुपयांच्या गैरप्रकारांची चौकशी सुरु असल्याची माहिती लोकसभेत सादर करण्यात आली आहे.

ईडीच्या कारवायांमध्ये आतापर्यंत किती दोषी
ईडीने 2005 पासून आतापर्यंत पीएमएलए कायद्यांतर्गत एकूण 3086 छापे टाकले आहेत. त्यासंदर्भात 4964 ईसीआयर दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणापैकी 943 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ईडीच्या कारवायांमध्ये आतापर्यत 23 जण दोषी आढळले आहेत.

दरम्यान, मोदी सरकारच्या काळात ईडी कारवायांमध्ये वाढ झाल्याने आता काँग्रेसकडून काय उत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण, राज्यात देखील महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांवर ईडी कारवाई करत आहेत. नुकतेच राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना देखील मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...