आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेसच्या हेरॉल्ड खटल्यापासून ते पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यापर्यंत दक्षता संचालनालयाची कारवाई सुरू आहे. त्यामुळेच ईडीच्या कारवाईने त्रस्त विरोधी पक्ष एकजूट होण्याचा प्रयत्न करत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ही मोट बांधणार आहेत. त्यासाठी ममता पाच दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत.
ममतांच्या दौऱ्याची सुरुवात बुधवारपासून होणार आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, तेलंगण राष्ट्र समितीचे केसीआर, सपा नेते अखिलेश यादव, आप नेते अरविंद केजरीवाल, द्रमुकचे एम. के. स्टॅलिन एका व्यासपीठावर येऊ शकतात. या पक्षांना मिळून लोकसभेत सुमारे 125 खासदार आहेत. ममता बुधवारी दिल्ली गाठतील. आधी त्या तृणमूल खासदारांची भेट घेतील. त्याच्या दुसऱ्या दिवशी इतर पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतील. शुक्रवारी त्या सोनियांना भेटतील. शनिवारी तेलंगण, तामिळनाडू, दिल्ली, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ममता एक यादी जाहीर करतील. भाजपमध्ये सहभागी झालेले किंवा अप्रत्यक्ष मदतीसाठी तयार असल्यामुळे त्यांच्या विरोधातील ईडीची कारवाई थांबली आहे याकडे ममता यादीच्या माध्यमातून लक्ष वेधण्याची शक्यता आहे.यापूर्वीही ममतांनी एकजुटीसाठी प्रयत्न केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.