आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ED Summons To Kharge While Parliament Is In Session; Eight Hours Of Interrogation

नॅशनल हेराॅल्डवरुन संसदेत गदारोळ:संसदेचे कामकाज सुरू असतानाच खरगे यांना ईडीचे समन्स; 8 तास चौकशी

नवी दिल्ली10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल हेराल्डवरील कारवाईवरून गुरुवारी संसदेत प्रचंड गदारोळ झाला. विरोधकांवरील ईडी कारवाया आणि पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर फौजफाटा तैनात करण्याचा मुद्दा काँग्रेसने संसदेत उपस्थित केला. याच वेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, संसदेचे कामकाज सुरू असतानाच मला ईडीने समन्स बजावले आहे. दुपारी १२.३० वाजता खरगे तडक नॅशनल हेराल्डच्या मुख्यालयावर पोहोचले. बुधवारी यंगा इंडियाच्या कार्यालयास टाळे ठोकले होते. खरगेंच्या उपस्थितीतच ईडीने हेराल्ड हाऊस इमारतीमधील यंग इंडियन कार्यालयाचे टाळे उघडले आणि खरगेंची चौकशी सुरू केली. आठ तासांच्या चौकशीनंतर रात्री ८.३० वाजता खरगे यांना सोडण्यात आले. तत्पूर्वी,विरोधी पक्षनेत्याला समन्स बजावल्याबद्दल संसदेत गदारोळ झाल्याने कामकाज तहकूब करावे लागले .

तपास संस्थांच्या कामात सरकारचा हस्तक्षेप नाही : पीयूष गोयल
सोनिया अन् राहुल गांधी कायद्यापेक्षा मोठे नाहीत

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, तपास संस्थांच्या कामात सरकार हस्तक्षेप करीत नाही. सोनिया - राहुल हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत, असा टोला भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी लगावला.

खरगेंच्या वतीने अल्वांसाठी, विरोधकांसाठी मेजवानी
उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यासाठी १६ विरोधी पक्षांच्या वतीने खरगे यांनी खासदारांसाठी रात्री ७.३० वाजता खास मेजवानी आयोजित केली होती, परंतु ईडीने त्यांना रात्री ८.३० वाजेपर्यंत सोडलेच नाही. विरोधी पक्षनेत्याला अशा पद्धतीने समन्स बजावणे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी व्यक्त केली.

महागाई, जीएसटीविरोधात काँग्रेसचे आज देशव्यापी अांदोलन
नियोजित कार्यक्रमानुसार महागाई, बेरोजगारी आणि खाद्यपदार्थांवरील जीएसटीच्या विरोधात शुक्रवारी काँग्रेसच्या वतीने देशभरात निदर्शने करण्यात येणार आहेत. काँग्रेसचे खासदार सकाळी ११ वाजता संसद भवनहून राष्ट्रपती भवनाकडे मोर्चा नेणार अाहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असून देशातील बिघडलेली आर्थिक परिस्थितीही काँग्रेस नेते त्यांच्या कानावर घालणार आहेत.

घाबरणार नाही,काय करायचे ते करुन घ्या : राहुल गांधी
नॅशनल हेराल्डच्या चौकशीवर बोलताना राहुल गांधी संतापले. नरेंद्र मोदी,अमित शहा यांच्या लोकशाहीविरोधातील कृत्याच्या निषेध आम्ही करणाच. त्यांनी काय करायचे ते सर्व करावे. मोदींना आम्ही घाबरणार नाही. शक्य असेल ते करा. काही फरक पडत नाही. देश आणि लोकशाहीचे रक्षण करणे हे माझे काम आहे. ते मी करतोय, असे राहुल गांधी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...