आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पार्थ चॅटर्जी व अर्पिता मुखर्जी यांना शुक्रवारी तिसऱ्यांदा वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेताना अर्पिताची प्रकृती बिघडली. कारमधून बाहेर पडताच ती धाय मोकलून रडू लागली. यावेळी ती रस्त्यावर खालीही बसली. दुसरीकडे, रुग्णालयात चॅटर्जींनी आपल्याला एका सुनियोजित कटांतर्गत फसवण्यात आल्याचा आरोप केला.
1000 कोटींचा शिक्षक भरती घोटाळा
ED सूत्रांच्या माहितीनुसार, हा संपूर्ण घोटाळा 1 हजार कोटींचा असण्याचा अंदाज आहे. यात केवळ टीचर्स रिक्रूटमेंटचाच पैसा नाही, तर पार्थ चॅटर्जींचा रिअल इस्टेटमध्ये लावलेलाही पैसाही आहे. सद्यस्थितीत ईडीचे पथक आणखी 15 ठिकाणी छापेमारी करू शकते. या प्रकरणी तृणमूल आमदार माणिक भट्टाचार्य यांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
रियल इस्टेटशी संबंधित दस्तावेज आढळले
ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, पार्थ चॅटर्जी अटकेनंतर 5 दिवसांपर्यंत केवळ ग्रीन टी व बिस्कुट घेत होते. बुधवारी रात्री त्यांनी डाळ-रोटी घेतली. गुरूवारी सायंकाळी त्यांच्या चिनारपार्क व नायाबादच्या फ्लॅटची झडती घेण्यात आली.
सूत्रांनुसार, या ठिकाणाहून 2 रियल इस्टेटशी संबंधित दस्तावेज आढळलेत. तपासात शिक्षक भरती घोटाळ्याची रकम रियल इस्टेटमध्ये गुंतवण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्पिताच्या फ्लॅटधून एक सोन्याची अंगठीही सापडली आहे. त्यावर P लिहिले आहे. तपास यंत्रणा रिंगविषयीही त्यांना प्रश्न करणार आहे.
पार्थ-अर्पिताशी संबंधित मोठे अपडेट्स
2 मोठी विधाने
1. ममता बॅनर्जी- चॅटर्जींनी चूक केली असेल तर त्यांना जन्मठेपही झाली, तर मला फरक पडत नाही. आम्ही त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. उर्वरित माहिती आताच सार्वजनिक करता येत नाही.
2. अभिषेक बॅनर्जी - पार्थ चॅटर्जी प्रकरणात आतापर्यंत जे काही झाले त्यावर आमची नजर होती. आम्ही त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. ते निर्दोष ठरले तरच त्यांच्यासाठी पक्षाची कवाडे खूली होतील.
ED सूत्रांच्या माहितीनुसार, 2012 मध्ये अर्पिता व पार्थ एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांनी संयुक्तपणे अनेक मालमत्ता खरेदी केल्या. त्याचे दस्तावेजही आढळलेत.
अर्पिताच्या कबुलीजबाबानंतर अडचणींत वाढ
ED सूत्रांच्या माहितीनुसार, अर्पिताने आपल्या फ्लॅटमध्ये आढळलेल्या 50 कोटींहून अधिकच्या रकमेविषयी प्रथमच मौन सोडले आहे. अर्पिताने गुरूवारी तपास यंत्रणेपुढे हा सर्व पैसा चॅटर्जींचा असून, आपल्याला त्याची कोणतीही माहिती नाही, असे स्पष्ट केले आहे. ईडी अर्पिताच्या जबाबाच्या आधारावर पार्थ चॅटर्जींवर पुढील कारवाई करेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.