आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयात वाढली:खाद्यतेलाच्या आयातीत फेब्रुवारीत 23 टक्क्यांनी झाली वाढ

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खाद्यतेलाची आयात फेब्रुवारीमध्ये २३ टक्क्यांनी वाढून ९,८३,६०८ टनांवर गेली आहे. मुख्यत: शुद्ध पाम तेलाच्या शिपमेंटमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे ही आयात वाढल्याचे साॅल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन आॅफ इंडिया या संस्थेने म्हटले आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात खाद्यतेलाची आयात ७,९६,५६८ टन झाली हाेती. वनस्पती तेलांची (खाद्य आणि अखाद्य) एकूण आयात फेब्रुवारी २०२१ मध्ये ८,३८,६०७ टनांच्या तुलनेत वाढून १०,१९,९९७ टनांवर गेली आहे. एकूण वनस्पती तेलाच्या आयातीपैकी खाद्यतेलाची आयात फेब्रुवारी २०२१ मध्ये ७,९६,५६८ टनांवरून ९,८३,६०८ टन झाली. रिफाइंड पाम तेलाची आयात ६,००० टनांवरून ३,०२,९२८ टनांपर्यंत वाढली.

बातम्या आणखी आहेत...