आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ED's Question To Rahul Gandhi, Does He Have An Account Abroad ... Where, How Much Is His Wealth ?, Rahul Appeared Before ED, 50 Questions In 10 Hours

नॅशनल हेरॉल्ड केस:ईडीचा राहुल गांधी यांना प्रश्न, विदेशात खाते आहे का?, कुठे, किती आहे संपत्ती?; 10 तासांत 50 प्रश्न विचारले

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी नॅशनल हेरॉल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सोमवारी सक्तवसुली संचालनालयासमोर (ईडी) हजर झाले. सकाळी ११.१० वाजता ईडीच्या मुख्यालयात पोहोचलेल्या राहुल यांची दोन टप्प्यांत १० तासांपेक्षा जास्त चौकशी झाली. त्यांना ५० वर प्रश्न विचारण्यात आले. तुमची किती आणि कोणकोणत्या बँकांत खाती आहेत, असा प्रश्न ईडीने राहुल यांना विचारला. विदेशी बँक खाती आणि संपत्तीबाबतही प्रश्न विचारले. त्यांची रात्री १० वाजेपर्यंत चौकशी झाली.

काही प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने ईडीने त्यांना मंगळवारी पुन्हा बोलावले आहे. दुसरीकडे, काँग्रेसने दिल्लीसहित देशभर ईडीविरुद्ध ‘सत्याग्रह’ केला. यादरम्यान दिल्लीत पायी मार्च करत असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासह २६ खासदार, ५ आमदारांसह ४५९ नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.

ईडी: ५० लाखांच्या शेअरसाठी पैसे कसे जमा केले?
यंग इंडिया, असोसिएटेड जर्नल्सची (एजेएल) हिस्सेदारी, देणी-घेणी व प्रवर्तकांची भूमिका समजून घेण्यासाठी ईडी राहुल यांची चौकशी करत आहे.

- संपत्ती कुठे कुठे आहे? विदेशात संपत्ती आहे का? असेल तर कुठे, किती? - एजीएलमध्ये तुमचे स्थान कोणते होते? यंग इंडियाशी कसे जोडले गेलात? - यंग इंडियाचे संचालक कसे झालात? कंपनी केव्हा आणि किती रुपयांत स्थापन केली? - यंग इंडिया एजीएलचे टेकओव्हर करू शकते का? टेकओव्हर केव्हा झाले? - कर्जाच्या परतफेडीसाठी जे पेमेंट झाले, ते कुणाच्या निर्णयावर देण्यात आले? - एजीएलचे ५० लाखांचे जे शेअर खरेदी केले त्याचे पेमेंट कसे केले? - तुमचा हिस्सा किती होता? कसे व किती रकमेत शेअर खरेदी केले? त्याची कागदपत्रे? - एजीएलचे ९०.९ कोटींचे देणे टेकओव्हरनंतर माफ का करण्यात आले? - काँग्रेसने नॅशनल हेरॉल्डला ९० कोटी दिले होते, मग शेअर स्वत:च्या नावाने का घेतले? - टेकओव्हरसाठी जुन्या शेअर होल्डर्सच्या बैठकीचे इतिवृत्त? की बैठक झाली नाही? - एजीएल हे बुडणारे जहाज असताना काँग्रेसने एजीएलला कर्ज का दिले? - नॅशनल हेरॉल्डचे पुनरुज्जीवन करण्यामागे काँग्रेसचा काय हेतू होता?

वेणुगोपालांना धक्काबुक्की, पी.चिदंबरम यांनाही दुखापत
सकाळी ११.०० वाजता राहुल गहलोत, बघेल, पी.चिदंबरम, प्रियंकांसह काँग्रेसच्या नेत्यांसोबत पक्ष मुख्यालयातून पायी ईडी कार्यालयाकडे गेले. या नेत्यांना पोलिसांनी ईडी मुख्यालयाआधी रोखल्यावर त्यांनी धरणे आंदोलन केले. यानंतर राहुल गाडीतून ईडी मुख्यालयात गेले. चिदंबरम म्हणाले, तीन पोलिस अंगावर आल्याने बरगडीला फ्रॅक्चर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे संगठन सरचिटणीस वेणुगोपाल यांनाही पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

गांधी कुटुंबाचे २००० कोटी रु. वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर
केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी म्हटले की, भ्रष्टाचाराला संरक्षण देण्यासाठी, गांधी कुटुंबाची २००० कोटींची संपत्ती वाचवण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरला आहे. जामिनावर असलेले लोक आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी आंदोलन करत आहेत. ईडीवर दबाव आणण्यासाठी नेत्यांना दिल्लीत बोलावले आहे.

बातम्या आणखी आहेत...