आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Education Minister Ramesh Pokhriyal Nishank To Interact Wtih Teachers About 10th 12th Board Examinations, Live Webinar To Be Held From 4 Pm

मोठा निर्णय:शिक्षण मंत्री म्हणाले- सध्याची परिस्थिती पाहता फेब्रुवारीपर्यंत CBSE परीक्षा घेता येणार नाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिक्षण मंत्र्यांनी देशभरातील शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधला

सध्या देशात असलेल्या कोरोना परिस्थितीमुळे येत्या फेब्रुवारीपर्यंत CBSE ची परीक्षा होणार नाही. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी मंगळवारी याबात माहिती दिली. त्यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन (CBSE) च्या बोर्ड परीक्षांबाबत सांगितले की, सध्याची परिस्थिती पाहता 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षा जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत होण्याची शक्यता फार कमी आहे. येणारी परिस्थिती पाहून परीक्षेची तारीख ठरवली जाईल.

शिक्षकांचे मानले आभार

देशभरातील शिक्षकांशी ऑनलाईन शिक्षणाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पोखरीयाल म्हणाले, दरवर्षी 15 फ्रेब्रुवारीपासून बोर्डाच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणे शक्य नाही. परीक्षा कधी घेता येईल याविषयी विचार-विनीमय केल्यानंतरच अंतीम निर्णय घेण्यात येईल. परीक्षेविषयीची सर्व माहिती वेळोवेळी विद्यार्थ्यांना दिली जाईल. लाइव्ह वेबिनारदरम्यान शिक्षण मंत्री म्हणाले की, कोरोना काळात शिक्षकांनी योद्धाप्रमाणे मुलांना शिकवले. यासाठी त्यांचे आभार.

बातम्या आणखी आहेत...