आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Education Ministers Meeting For 12th Board Exam And Professional Education Exams

CBSE 12वी बोर्ड परीक्षा:केवळ मुख्य विषयांच्या परीक्षा होऊ शकतात, रविवारी राज्यांसोबतच्या मीटिंगमध्ये होऊ शकतो निर्णय

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटे दरम्यान बारावीच्या मुख्य विषयांची परीक्षा घेण्याचा विचार करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर, असा निर्णय घेतला जाऊ शकतो की बारावीच्या मुख्य विषयांची परीक्षा घेतली जावी आणि इतर विषयांच्या मार्क्ससाठी इतर फॉर्म्युलाचा अवलंब करावा.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे सरकारने 12 वी बोर्डाची परीक्षा पुढे ढकलली होती. संरक्षण शिक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मंत्री आणि अधिकारी यांच्या उच्चस्तरीय बैठकीत १२ वीच्या परीक्षा आणि प्रोफेशनल एज्युकेशन एंट्रन्स टेस्टवर निर्णय घेतला जाऊ शकतो.या बैठकीला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि प्रकाश जावडेकरसुद्धा उपस्थित असतील.

सीबीएसई 12 वीसाठी 174 सब्जेक्ट्स, यामध्ये 20 मेजर
सीबीएसई 12 वी मध्ये 174 विषयांचा अभ्यास घेते. यापैकी केवळ 20 विषयांना प्रमुख विषय मानले जाते. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, व्यवसाय अभ्यास, लेखाशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र आणि इंग्रजी यांचा समावेश आहे. सीबीएसईचा कोणताही विद्यार्थी किमान 5 आणि जास्तीत जास्त 6 विषय घेतो, सहसा यामध्ये 4 मोठे विषय असतात.

बातम्या आणखी आहेत...