आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • RSS Meeting | Education Of Hinduism In Schools And Colleges, Verdicts In Indian Languages In Court; Meeting In Raipur In The Presence Of Sarsangh Leaders

संघाची भूमिका:शाळा-महाविद्यालयांत हिंदुत्वाचे शिक्षण, न्यायालयात भारतीय भाषांत निकाल हवेत

रायपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रायपूरमध्ये सरसंघचालकांच्या उपस्थितीत बैठक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीनदिवसीय समन्वय बैठक सोमवारी झाली. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत शिक्षण, राेजगार, आर्थिक, सामाजिक यासारख्या मुद्‌द्यांवर विस्ताराने चर्चा झाली. संघाच्या सर्व ३६ संघटनांशी चर्चा केल्यानंतर देशात सकारात्मक बदलावंर काम झाले पाहिजे, यावर एकमत झाले. स्थानिक स्तरावर ग्राम आधारित अर्थव्यवस्था पुन्हा सुरू करण्यावर चर्चा झाली. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करणे, शाळा-महाविद्यालयांत भारतीय भाषांमध्ये निकाल आणि जीडीपीऐवजी भारतीय मापदंड निर्देशांक तयार करण्यावर विचार करण्यात आला.

संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी सोमवारी ही माहिती दिली. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये हिंदुत्वाचे शिक्षण दिले जात आहे, त्यामुळे ते येथेही दिले पाहिजे. हिंदुत्वाबाबत योग्य माहिती काय आहे याचा शिक्षणव्यवस्थेत समावेश व्हावा. न्यायालयांत भारतीय भाषांत काम व्हावे. निकाल भारतीय भाषांत असावा. वकील आणि न्यायाधीश इंग्रजीत काय बोलतात ते लोकांना कळत नाही. असे सांगून वैद्य म्हणाले, राष्ट्र म्हणजे समाज असतो, त्यामुळे येथील समाज हिंदू आहे.

बातम्या आणखी आहेत...