आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Educational Policy Changed | 10 + 2 Formula Will Be Canceled; Now Education With 5 + 3 + 3 + 4 Pattern, After 34 Years The Educational Policy Of The Country Has Changed

शैक्षणिक धोरणात बदल:10+2 सूत्र होईल रद्द; आता 5+3+3+4 पॅटर्नने शिक्षण, 34 वर्षांनंतर बदलले देशाचे शैक्षणिक धोरण

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5+3+3+4 पद्धतीचे महत्त्व असे जाणून घ्या

केंद्र सरकारने बुधवारी नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी दिली. यात शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत मोठे बदल आहेत. आता शालेय शिक्षणासाठी 10+2 ऐवजी 5+3+3+4 हा पॅटर्न असेल. पाचवीपर्यंत मुले मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेत शिक्षण घेतील. आवडीचे विषय निवडण्याचे अनेक पर्याय असतील. कला-विज्ञान, अभ्यासक्रम आणि व्यावसायिक विषय आता वेगळे नसतील. सहावीपासून कोडिंग शिकवले जाईल. याच इयत्तेत व्यावसायिक शिक्षण सुरू होईल. यात इंटर्नशिपही समाविष्ट असेल.

२१व्या शतकातील हे पहिलेच शैक्षणिक धोरण. भारतात ३४ वर्षांनंतर हे धोरण बदलले. यापूर्वी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ मध्ये धोरण आखले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती देताना केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितले, शिक्षणावर सध्या जीडीपीच्या ४.४% खर्च होत आहे. तो ६% केला जाईल. नवीन धोरणात मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून शिक्षण मंत्रालय असे केले आहे.

5+3+3+4 पद्धतीचे महत्त्व असे जाणून घ्या

३ वर्षांच्या अंगणवाडी/ शाळापूर्व शिक्षणासोबत १२ वर्षांचे शालेय शिक्षण असेल. ही वर्षे चार भागात विभागण्यात आली आहेत. पहिल्या भागात ३ ते ६ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना पूर्व प्राथमिकसह दुसरीपर्यंत शिक्षण. दुसऱ्या भागात तिसरी ते पाचवीचा अभ्यासक्रम. तिसऱ्या भागात ६वी ते ८वीचा तयार केला जाईल. यादरम्यान विषयांची ओळख करून दिली जाईल. चौथ्या भागात नववी ते १२वीचे विद्यार्थी असतील. यादरम्यान विद्यार्थ्यांकडे विशेष विषयांसह प्रॅक्टिकलवरही लक्ष दिले जाईल.

> ५वीपर्यंत शिक्षण मातृभाषेत किंवा प्रादेशिक भाषेतूनच

> विज्ञान, कला शाखांत आता फरक नसेल{सहावीपासूनच कोडिंग, ऐच्छिक अभ्यासक्रम सुरू

> सहावीपासूनच कोडिंग, ऐच्छिक अभ्यासक्रम सुरू

> शिक्षणावर जीडीपीच्या ६% खर्च होईल

शिक्षकांशिवाय स्वत: विद्यार्थी आणि मित्रही करतील असेसमेंट

> आर्टिफिशियल इंटेलिजन्स : नवा अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन तीन पातळ्यांवर होईल. पहिले - विद्यार्थी स्वत: मूल्यमापन, दुसरे - सहकारी मूल्यमापन करतील. तिसरे - शिक्षक मूल्यमापन करतील. १२वी उत्तीर्ण होताना संपूर्ण शालेय शिक्षणाचे मूल्यमापन एआयच्या मदतीने होईल.

> सहावीपासून इंटर्नशिप : सुरुवातीपासूनच व्यावसायिक शिक्षण सुरू केले जाईल.

> ३.५ कोटी नव्या जागा : उच्च शिक्षणात जास्तीत जास्त विद्यार्थी यावेत हा उद्देश.

> स्वत:चा अभ्यासक्रमही : पदवीपूर्व महाविद्यालये अधिक स्वायत्त. ते विषय व अभ्यासक्रम निश्चित करतील. महाविद्यालयांना मान्यता देण्याची पद्धत १५ वर्षांत बंद होईल.

> बीएड कॉलेज बंद होतील : चार वर्षांचा बीएड कोर्स असेल. बीएड कॉलेज बंद होतील. सामान्य कॉलेजमधूनच बीएडची पदवी मिळेल.

> नोकरी काळात सूट मिळेल : संशोधनासाठी चार वर्षांचा पदवी कार्यक्रम. जे नोकरी करू इच्छितात, त्यांना ३ वर्षांचा पदवी कार्यक्रम पूर्ण करावा लागेल. संशोधनासाठी १ वर्षाच्या एमएसह चार वर्षांचा पदवी कार्यक्रम पूर्ण केल्यावरच पीएचडी करता येईल.

> शिक्षकांसाठी अभ्यासक्रम : एनसीटीई अध्यापनाच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय प्रारूप - एनसीएफटीई, २०२१ तयार करेल. वेगवेगळ्या संस्था महाविद्यालयांचे कामकाज पाहतील. निधी, दर्जा, अॅक्रिडेशन, नियमन यासाठी वेगवेगळ्या संस्था असतील.

> व्हर्टिकल नेमणार : उच्च शिक्षणासाठी नियम सौम्य, मात्र कठोर अंमलबजावणी असेल. एका नियामकात चार व्हर्टिकल.

> परदेशी विद्यापीठे येतील : उच्च रँकिंग असलेल्या विद्यापीठांनाच भारतात कॅम्पस उघडण्याची परवानगी दिली जाईल.

एकाच वेळी शिका विज्ञान अन् इतिहास

नव्या शैक्षणिक धोरणात विज्ञानाचे विद्यार्थी इतिहास वा कला शाखेच्या कोणत्याही विषयांचा अभ्यास करू शकतील. विद्यार्थ्याला अडचणीचे वाटल्यास तो विषय ड्रॉपही करू शकेल. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुख्य शाखा म्हणजे कला वा विज्ञान शाखेच्या आधारावरच पदवी मिळेल. नव्या शैक्षणिक धोरणात आता विद्यार्थी इयत्ता सहावीपासून व्यावसायिक अभ्यासक्रमासह अॅप्रेंटिसशिपही करतील. १२ वीनंतर व्यवसाय सुरू करू पाहणाऱ्यांना अॅप्रेंटिसशिपमधून मिळालेल्या या व्यावहारिक ज्ञानाचा फायदा होईल.