आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:चीनला चांगला धडा शिकवण्यासाठी स्वदेशी वापरा - सोनम वांगचुक

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिक्षणतज्ञ, इनोव्हेटर वांगचुक यांनी सुरू केले बायकॉट मेड इन चायना अभियान

अमितकुमार रंजन 

लडाखमध्ये सीमेवर सध्या भारत-चीन सैनिक समोरासमोर आले आहेत. या स्थितीत चीनला धडा शिकवण्यासाठी शिक्षणतज्ञ व इनोव्हेटर सोनम वांगचुक यांनी मेड इन चायना मालावर बहिष्कार टाकून त्या देशाची आर्थिक स्थिती कमकुवत करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. चिनी वस्तूंवर इतक्या मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाका की त्या देशाची अर्थव्यवस्था ढासळावी, असे आवाहन त्यांनी केले. सोनम वांगचुक यांनी दैनिक भास्करला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी या मोहिमेबद्दल सविस्तर सांगितले.

चीनला वगळून बाजारपेठा उभारल्या तर इतर देशांकडून पर्याय समोर येतील

चिनी सॉफ्टवेअर एक आठवड्यात आणि चिनी हार्डवेअर एक वर्षात बॉयकॉट करायला हवे. चीनमध्ये तयार झालेली एकही वस्तू खरेदी करायची नाही, असा दृढनिश्चय आपल्याला करावा लागेल. मग जे होईल ते होवो...

सध्या आपण उत्पादन, हार्डवेअर, औषधांसाठीचा कच्चा माल, वैद्यकीय उपकरणे, चप्पल-बूट अशा कित्येक वस्तूंसाठी चीनवर अवलंबून आहोत. कारण, यापैकी अनेक वस्तूंचे आपल्या देशात उत्पादन कमी होते. जे होते, ते महाग असते. मात्र, जनतेने आता ओळखले पाहिजे की चिनी वस्तू खरेदी कराल तर पैसा चीनच्या खिशात जाईल. यातून बंदुका खरेदी करून त्या आपल्यावरच रोखल्या जातील. आपण जर आपल्या देशातील थोडे महाग का असेना, देशी सामान खरेदी केले तर पैसा मजूर, कामगार व शेतकऱ्यांसाठी कामी येईल. चिनी वस्त्ूंवर तत्काळ आपण बहिष्कार टाकू शकत नाहीत. नियोजनबद्धपणे ते करायला हवे. हार्डवेअरबाबत एक वर्ष वाट पाहा. त्या काळात देशी कंपन्यांनी इतर देशांतील कंपन्यांकडून ते मिळवण्याचा मार्ग शोधावा. कच्च्या मालाबाबत कंपन्यांनी असेच पर्याय शोधले पाहिजेत. 

चिनी सॉफ्टवेअरवर एक आठवड्यांत आणि हार्डवेअरवर एक वर्षांत बहिष्कार टाकायला हवा. यासाठी दृढनिश्चय करायला हवा. यासाठी उदाहरण द्यायचे झाले तर जैन धर्माचे देता येईल. जैन धर्माचे लोक मांस, कांदा खातच नाहीत. मग जे काय होईल ते हाेवो. ते हे पथ्य पाळतातच. याचा परिणाम असा झाला की, जैन पद्धतीचे भोजन मिळू शकेल अशी हॉटेल्स सुरू झाली. यातून नव्या सवयी आणि परंपरांसोबत बाजारपेठा उभारल्या गेल्या. अशी भोजनालये, रेस्तराँ मोठ्या प्रमाणात सुरू झाले. अशाच प्रकारे चीनची मक्तेदारी कमी करून चिनी वस्तू नसलेल्या बाजारपेठा उभ्या राहायला हव्यात. यात जनतेचाच पुढाकार महत्त्वाचा आहे. सरकारने काय करावे हे जनताच ठरवू शकते. लोकांची मानसिकता बदलली तर आपोआप सरकारचे धोरणही बदलेल. म्हणूनच आता हे पाऊल टाकायला हवे.

बातम्या आणखी आहेत...